Weight loss diet mistakes that can make you gain weight | वजन कमी करण्याच्या नादात 'या' चुका कराल; तर बारिक होणं कायमचं विसराल

वजन कमी करण्याच्या नादात 'या' चुका कराल; तर बारिक होणं कायमचं विसराल

बारिक होणं हे अनेकांसाठी मोठं आव्हान असतं. त्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. पण परफेक्ट शेप आणि वजन नियंत्रणात ठेवणं फारच कठीण आहे.  वजन कमी केल्यानंतरही अनेकांचे वजन पुन्हा दुप्पटीने वाढतं. वजन कमी करण्याासाठी लोक खूप घाम गाळतात पण काही चूका  केल्यानं शरीरावरची चरबी कमी होण्याऐवजी अधिकच वाढत जाते. अनेकदा बसून तासनतास काम केल्यामुळे शरीराची पुरेशी हालचाल होत नाही आणि शरीराचा आकार बेढब दिसतो. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

अलिकडच्या लाइफस्टाईलमध्ये लोक पायी चालणे किंवा पायऱ्यांचा वापर करणे फारच कमी झालं आहे. लोक कुठेही जाण्यासाठी गाडीचा वापर अधिक करतात किंवा लिफ्टचा वापर करतात. पण जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर पायऱ्यांचा आणि पायी चालण्याचा पर्याय सर्वात बेस्ट आहे. सकाळी ४० मिनिटे पायी चालण्याची सवय लावा.

वजन कमी झाल्यानंतर आधीप्रमाणे जास्त आहार घेऊ नका. कारण तुमचं वजन पुन्हा वाढू शकतं. डॉक्टरांचा सल्ला  घेऊन जितक्या कॅलरीजची आवश्यकता असते. तितकंच सेवन करा. वजन कमी झाल्यानंतर तुम्ही डाएट किंवा व्यायाम करणं सोडून देत असाल तर पुन्हा लठ्ठपणा येण्याची शक्यता असते. म्हणून वजन मेंटेन ठेवण्याासाठी डाएट आणि वर्कआऊट  रुटीन फॉलो करा. आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा. 

NBT

अनेकजण पॅकफूड जास्त प्रमाणात खातात. पॅकफूड जास्त प्रमाणात खाल्यानं चरबी वाढत जाते. म्हणून ताजे शिजवलेले अन्नपदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.  बाहेरचे अन्नपदार्थ खाणं पूर्णपणे टाळा. कार्बोहायड्रेट्च्या सेवनाने लठ्ठपणाची समस्या वाढू शकते. म्हणून भात, बटाटा असे कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणं टाळा.  कमी झोप घेतल्यानं वजन वाढण्याची शक्यता जास्त म्हणून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेश्या प्रमाणात झोप घ्या. झोप योग्य प्रमाणात घेतली नाही तर कॉर्टीसोलचं आणि ताण तणावाचं  प्रमाण वाढतं.

जास्तीत जास्त पाणी प्या. रोजच्या अन्नाचे सेवन करताना कॅलरीज काऊंट करू नका. त्यामुळे वजन कमी होणार नाही तर अधिकच वाढत जाईल. जास्तीत जास्त लोकांमध्ये लठ्ठपणाचं कारण हे त्यांचं रात्री उशीरा जेवण करणं असतं. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर रात्री जास्त उशीरा जेवण करू नका. तसेच रात्री हलकं जेवण करावं, जे सहज पचेल. त्यासोबतच जेवण केल्यावर थोडावेळ पायी चालण्याची सवय लावा, लगेच झोपू नका.

हे पण वाचा :

२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या

अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Weight loss diet mistakes that can make you gain weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.