शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यात वजन का वाढतं? तुम्हालाही माहीत नसेल हे कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 17:45 IST

Weight gain in winter : सामान्यपणे असं मानलं जातं की, हाय कॅलरी फूड आणि एक्सरसाइज न केल्यामुळे या दिवसात आपलं वजन वाढतं.

Weight gain in winter : हिवाळा आला की, अनेकांना वजन वाढण्याचं टेंशन असतं. कारण या दिवसात अनेकांचं वजन वाढतं. पण याचं नेमकं कारण काय असतं हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. अनेकांना वाटतं की, पालेभाज्या, कडधान्य किंवा पौष्टिक आहाराने या दिवसात वजन वाढतं. पण खरं कारण एका रिसर्चमधून आलं आहे. या रिसर्चनुसार, कॅलरीज स्टोर करण्याची शरीराची सवय थंडीच्या दिवसात अधिक वाढते. त्यामुळे थंडीच्या दिवसात वाढत्या वजनावर कंट्रोल  ठेवणं अवघड जातं. 

सामान्यपणे असं मानलं जातं की, हाय कॅलरी फूड आणि एक्सरसाइज न केल्यामुळे या दिवसात आपलं वजन वाढतं. पण रिसर्चमधून समोर आलं आहे की, केवळ ही दोनच कारणे हिवाळ्यात वजन वाढण्याला कारणीभूत नाहीत तर  हिवाळ्यात शरीराला कॅलरी स्टोर करून ठेवण्याची सवय असते, त्यामुळेच या दिवसात लोकांचं वजन वाढतं.

हिवाळ्यात वजन वाढण्याची इतर कारणे

हिवाळ्यात लोक हे हायबरनेशन मोडमध्ये जातात. ज्यामुळे ते आपल्या बिछान्यात शरीर गरम करण्याचा प्रयत्न करत असतात आणि लेझी आवर्सचा काळ वाढतो. वैज्ञानिकांना आढळलं की, अस्वलांप्रमाणे मनुष्य सुद्धा हिवाळ्यात स्वत:ला हायबरनेट करतात आणि दररोज साधारण 200 कॅलरी अधिक घेतात.

स्लीप हार्मोन

रिसर्चमधून समोर आले आहे की, या काळात दिवस लहान असल्याने आणि उन्हाच्या संपर्कात आल्याने शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होतो. शरीरातील पीनल ग्लॅंड अधिक प्रमाणात मेलाटोनिन रिलीज करू लागतं. हे एक स्लीप हार्मोन आहे. यामुळे सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर वाढू लागतं आणि आपल्याला हिवाळ्यात जास्त झोप येते. याकारणाने आपली शारीरिक हालचाल कमी होते आणि आहार जास्त घेतला जातो. 

मेटाबॉलिज्म 

या दिवसात आपल्या शरीराला गरमी देण्यासाठी आपलं मेटाबॉलिज्म अधिक एनर्जी बर्न करू लागतं. एक्सपर्ट्स सांगतात की, या एक्स्ट्रा एनर्जीसाठी शरीराला जास्त आहाराची गरज पडते. पण असं अजिबात नाहीये की, जास्त खाऊन आपण शरीराला गरमी देऊ शकतो. जर आपण गरम वातावरणात राहिलो तर आपल्या शरीराला कमी भूक लागेल आणि वजन नियंत्रणात राहणार.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स