दीर्घायुष्य हवंय तर 'ही' गोष्ट आहे गरजेची, अभ्यासातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 12:06 PM2018-08-31T12:06:35+5:302018-08-31T12:06:46+5:30

एका नव्या अभ्यासातून खुलासा झाला आहे की, जर तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल तर तुम्हाला तुमच्या कामातून काही दिवसांची सुट्टी घेऊन फिरायला जावं लागेल.

Want to live longer take leave from your work | दीर्घायुष्य हवंय तर 'ही' गोष्ट आहे गरजेची, अभ्यासातून खुलासा

दीर्घायुष्य हवंय तर 'ही' गोष्ट आहे गरजेची, अभ्यासातून खुलासा

लंडन : एका नव्या अभ्यासातून खुलासा झाला आहे की, जर तुम्हाला दीर्घायुष्य हवं असेल तर तुम्हाला तुमच्या कामातून काही दिवसांची सुट्टी घेऊन फिरायला जावं लागेल. हा अभ्यास पूर्ण करण्यासाठी अभ्यासकांना साधारण ४० वर्ष वेळ लागला आणि या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला की, जे लोक ज्यांनी १ वर्षात ३ आठवड्यांपेक्षा कमी सुट्टी घेतली त्यांच्या मृत्यूचा शक्यता सुट्टी घेणाऱ्यांच्या तुलनेत ३ टक्के अधिक होती. 

यासाठी गरजेची सुट्टी

फिनलॅंडच्या यूनिव्हर्सिटी ऑफ हेलसिन्कीचे प्रोफेसर टीमो स्ट्रॅडबर्ग म्हणाले की, जर तुम्हाला असा विचार करत असाल की, सुट्टी न घेता सतत केली गेलेली मेहनत तुम्हाला कोणतही नुकसान पोहोचवणार नाही. कारण लाइफस्टाइल हेल्दी आहे आणि तुम्ही तुमच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेता तर तुम्ही चुकी करताय. अभ्यासकांनुसार, जेव्हा विषय दीर्धायुष्य आणि स्ट्रेसपासून सुटका मिळवण्याचा येतो तेव्हा केवळ हेल्दी डाएट आणि रेग्युलर एक्सरसाईज पुरेशी नाहीये. यासाठी कामातून सुट्टी घेणे फार गरजेचे आहे. 

१ वर्षात किती सुट्टी गरजेची?

या अभ्यासाची सुरुवात १९७० मध्ये झाली होती आणि यात १ हजार २२२ मध्यम वयातील लोकांना सहभागी केले होते. त्यांचा जन्म १९१९ आणि १९३४ दरम्यानचा होता. या सर्वच लोकांना हाय ब्लड प्रेशर. स्मोकिंग आणि जाडेपणामुळे हृदय रोगाचा धोका होता. रिसर्चमध्ये सहभागी ५० टक्के लोकांना एक्सरसाइज करणे, खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे, धुम्रपानापासून दूर राहणे आणि हेल्दी वेट मेन्टेन करण्याचा सल्ला दिला होता. या अभ्यासात सहभागी असे लोक ज्यांनी १ वर्षात तीन आठवड्यांपेक्षा कमी सुट्टी घेतली, त्यांचा पुढील ३० वर्षात मृत्यूचा धोका ३७ टक्के अधिक होता. 
 

Web Title: Want to live longer take leave from your work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.