शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

शरीरातील अतिरिक्त चरबी आणि वजन कमी करण्यासाठी 'अक्रोड' आहे रामबाण उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 11:06 AM

अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फॅट असूनही याने वजन कमी करण्यास मदत कशी होते? असा प्रश्न पडू शकतो.

(Image Credit : YouTube)

ड्रायफ्रूट्स हे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सर्वांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्सचे वेगवेगळे फायदे होतात. रोज मुठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने शरीराला वेगवेगळे पोषक तत्त्व मिळतात. ड्रायफ्रूट्समधील अक्रोडमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. अक्रोडचा त्या लोकांना अधिक फायदा होतो, जे वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

अक्रोडमध्ये असतात गुड फॅट

अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात फॅट असूनही याने वजन कमी करण्यास मदत कशी होते? असा प्रश्न पडू शकतो. अक्रोडमधील गुड फॅट असतं, जे वजन वाढवण्याऐवजी वजन कमी करण्यास मदत करतं. एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, अक्रोड वजन करण्यासाठी फायदेशीर ठरतं. अभ्यासकांनी लठ्ठपणा, डायबिटीस आणि मेटाबॉलिज्मवर एक रिसर्च केला.

(Image Credit : Daily Express)

या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी १० असा लोकांचा समावेश केला होता, ज्यांना डायबिटीस होता. यांना १ महिना वेगवेगळी डाएट देण्यात आली. जसे की, काही दिवस अक्रोड आणि स्मूदी, तर काही दिवस केवळ स्मूदी. त्यानंतर १ महिन्यांनी त्यांना नॉर्मल डाएट दिली गेली. दरम्यान अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या ब्रेन अ‍ॅक्टिविटीमध्ये होणाऱ्या बदलांवर नजर ठेवली. यासाठी त्यांनी फंक्शनल मॅग्नेटिक रेजोनेंस इमेंजिग मशीनचा वापर केला.

काय आलेत निष्कर्ष?

या रिसर्चमधून दोन निष्कर्ष समोर आलेत. पहिला हा की, अक्रोड आणि स्मूदीनंतर सहभागी लोकांना भूक नॉर्मल स्मूदीच्या तुलनेत कमी भूक जाणवली. दुसरा हा की, अक्रोड स्मूदीच्या ५ दिवसांनंतर सहभागी लोकांच्या ब्रेन अ‍ॅक्टिविटीमध्ये फरक होता. अभ्यासकांनुसार, अक्रोड भूक कंट्रोल करण्यात मदत करतात. याप्रकारे वजन कमी करण्यास मदत मिळते.

(Image Credit : express.co.uk)

वजन कमी करण्यात कसा होतो फायदा?

1) मोनोअनसॅच्युरेडेट फॅच असलेले इतर नट्सच्या उलट अक्रोडमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण अधिक असतं. हे गुड फॅट असतात. याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं आणि शरीराचं आरोग्य अधिक चांगलं होतं.

२) अक्रोडमध्ये असलेल्या अल्फा-लिनोलेनिक अॅसिड किंवा एएलए(ओमेगा-२ फॅटी अॅसिडचं एक रूप) हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ओळखलं जातं. याने शरीराला लवकर फॅट बर्न करण्यासाठी प्रेरणा मिळते.

३) असे मानले जाते की, अक्रोड मेंदूतील राइट-इंसुला या भागाला उत्तेजित करतं. मेंदूचा हा भाग भूक नियंत्रित करतं. 

४) जर्नल न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित एक रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, दर व्यक्ती अक्रोडमधील ३०० कॅलरीज दररोज घेतील, तर ते अधिक चांगल्याप्रकारे वजन कमी करू शकतात.  

५) एलाजिक अ‍ॅसिड नावाचं अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट सूज कमी करण्याचं काम करतं आणि आतड्या निरोगी ठेवतं. याने पचनक्रिया सुधारते. तसेच अतिरिक्त कॅलरी आणि फॅट वेगाने नष्ट करतं.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स