ट्विटरचा संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी (४२) हा सध्या त्याच्या विचित्र सवयींमुळे सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. जॅक डॉर्सी हा सध्या दररोज २४ तासांपैकी २२ तास फास्टींग करत आहे. ब्रेकफास्ट आणि लंच न करता थेट रात्रीचं जेवण करतो. तसेच ८ किमोमीटर पायी चालून ऑफिसला जातो आणि दररोज सकाळी १५ मिनिटे बर्फाच्या थंड पाण्यात आंघोळ करतो. इतकेच नाही तर जॅक विकेंडला सुद्धा काही खात नाही आणि २ दिवस केवळ पाणी पिऊन काढतो.
एका आठवड्यात केवळ ५ वेळा जेवण
जॅक डॉर्सी सांगतो की, अशाप्रकारची स्ट्रीक्ट डाएट आणि हेल्थ प्लॅन फॉलो करुन त्याला फोकस आणि शार्प राहण्यास मदत मिळते. जॅक सांगतो की, या स्पेशल रुटीनमुळे त्याचा मेंदू क्लीअर असतो की, त्याला बेडवर पडल्यावर लगेच १० मिनिटात गार झोप लागते. पण त्याच्या आठवड्यातून केवळ ५ वेळा जेवण करण्यावरुन सोशल मीडियात डिबेट सुरु झाली आहे. काही लोक याला इटिंग डिसऑर्डर म्हणजेच आजार म्हणत आहेत.
वन मील अ डे काय आहे?
जॅक डॉर्सी हा वन मील अ डे म्हणजेच दिवसातून एकदाच जेवण करण्याचा प्लॅन फॉलो करतो. हे निरंतर उपवासाचं एक्सट्रीम वर्जन आहे. वजन कमी करुन किंवा शरीर डीटॉक्स करुन मानसिक आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने अनेकजण अशा प्रकारची फास्टींग फॉलो करतात. ज्यात तुम्हाला दिवसातील एका ठराविक वेळीच जेवण करायचं असतं. पण हा प्लॅन तेव्हाच फायदेशीर ठरतो जेव्हा याला योग्यप्रकारे केलं जातं.
शरीराला होतात वेगवेगळे नुकसान
दिवसभरात केवळ एकदाच जेवण करण्याच्या डाएटचे अनेक दुष्परिणामही आहेत.
- फार जास्त भूक लागल्यासारखं वाटणे
- शरीर थरथरणे
- फार जास्त कमजोरी वाटणे
- थकवा आणि चिडचिडपणा
- कामावर लक्ष केंद्रीत होण्यास अडचण येणे
याने वाढतो बॅड कोलेस्ट्रॉल
वरील समस्यांसोबतच एका रिसर्चमधून समोर आलं होतं की, इटरमिटेंट फास्टींग म्हणजेच दररोज केवळ एकदाच जेवण करण्याच्या डाएट प्लॅनमुळे भलेही वजन कमी होत असेल पण याने शरीरात एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण फार वाढतं. बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा थेट संबंध हा हृदयरोगांशी संबंधित आजारांशी आणि स्ट्रोकसोबत आहे. तसेच वन मील इ डे डाएट फॉलो केल्याने बाइंज इटिंग म्हणजेच इच्छा नसताना जास्त खाण्याची सवयही तुमच्यात विकसीत होऊ शकते.