शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

तरुणांनो दाढी वाढत नाही? तर 'या' टिप्स फॉलो कराच, दिसाल ट्रेण्डी अन् मस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:40 IST

दाढीचे केस वाढणं थांबवण्याची अनेक कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला दाढी वाढण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.

आजकाल तरुणांमध्ये दाढी ठेवण्याचा ट्रेंड आहे. हॉलिवूडपासून ते बॉलीवूडपर्यंत पुरुष दाढीचे वेगवेगळे प्रयोग करताना दिसतात. पण काही जणांचीच दाढी चांगली आणि दाट असते. असे काही लोक आहेत ज्यांची दाढी फारशी चांगली दिसत नाही किंवा चेहऱ्यावर थोड्या-थोड्या भागांवर केस असल्यानं ती विरळ खराब दिसते. यापैकी अनेकजण ही समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांची मदत (Patchy Beard Problems) देखील घेतात.

काही पुरुष ग्रूमिंग रूटीनचा (Grooming Routine) अवलंब करून दाढी (Beard Growth) वाढवतात. परंतु, काही लोकांची दाढी सर्व प्रयत्न करूनही फारशी वाढत नाही. बाजारात दाढी वाढवण्यासाठी अनेक प्रकारची प्रसाधनं किंवा सौंदर्य उत्पादनं उपलब्ध आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असली तरी त्यांचा सर्वांवर चांगला परिणाम होतो असं नाही. दाढीचे केस वाढणं थांबवण्याची अनेक कारणे आहेत. आज आम्ही तुम्हाला दाढी वाढण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी सांगत आहोत.

शरीरातील संप्रेरकांचं असंतुलन (Hormonal Imbalance)केसांच्या वाढीसाठी शरीरातील संप्रेरकांची पातळी योग्य असणं आवश्यक आहे. जर तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असेल तर त्याचा तुमच्या दाढीच्या वाढीवरही परिणाम होतो. ते ओळखण्याचा एक अतिशय अनोखा आणि सोपा मार्ग आहे. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर तुमची अनामिका तुमच्या तर्जनीपेक्षा लांब असेल तर याचा अर्थ तुमच्या वाढत्या वयात टेस्टोस्टेरॉन चांगलं काम करत असेल. पण जर तसं नसेल, तर टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही अश्वगंधा, ऑयस्टर एक्स्ट्रॅक्ट, टोंगकट अली, झिंक सप्लिमेंट्स वापरू शकता. याचा तुमच्या दाढीच्या वाढीवर नक्कीच चांगला परिणाम होईल.

अनुवांशिक समस्याजर तुमच्या वडिलांची किंवा आजोबांची दाढी कमी आणि थोड्या-थोड्या भागांवर असेल तर ही तुमच्यातील अनुवांशिक समस्या असू शकते. असं असल्यास आपल्या आहाराकडं अधिक लक्ष द्या आणि उच्च प्रथिनयुक्त आहार, झिंक सप्लिमेंट्स घ्या. तसंच, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तणावाचे प्रमुख कारणतणावाचा आपल्या शरीरावर तसंच आपली त्वचा, केस आणि दाढीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आपण आपल्या जीवनात तणावाची पातळी वाढणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी चांगल्या जीवनशैलीचा अवलंब करा. तसंच, आपल्या रोजच्या जेवणात पौष्टिक अन्न आणि व्यायामाचा समावेश करा.

वैद्यकीय इतिहास हे देखील कारण असू शकतेतुमचा वैद्यकीय इतिहास (medical history) देखील याचं कारण असू शकतं. तुम्‍हाला अ‍ॅलोपेशिया अरियाटा नावाचा आजार असल्‍यास, तुमच्‍या शरीरावरील केस गळण्‍याची शक्‍यता असते. ही स्थिती तुमच्या डोक्याच्या आणि शरीराच्या केसांनाच नाही तर, दाढीलाही नुकसान पोहोचवू शकते.

काय आहे उपायशक्यतोवर जीवनात ताणतणाव वाढू देऊ नका. तुमच्या जीवनशैलीत सकस आहार, नियमित व्यायाम आणि आरोग्यास पूरक आहाराचा समावेश करा. जर तुमची समस्या अनुवांशिक असेल तर डॉक्टरांची मदत घ्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स