बाळाच्या योग्य जपणुकीसाठी दंतकथा दूरच ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 03:24 PM2019-12-09T15:24:22+5:302019-12-09T15:25:57+5:30

मूल जन्माला आल्यानंतर घरात एक वेगळाच उल्हास आणि उत्साह असतो. त्यामुळे घरातील सर्वच सदस्य बाळाची काळजी घेत असतात.पण बाळासाठी योग्य आणि सर्वोत्कृष्ट उपयुक्त उत्पादने निवडताना आईची खरी कसोटी लागते.

things you read while handling small babies | बाळाच्या योग्य जपणुकीसाठी दंतकथा दूरच ठेवा!

बाळाच्या योग्य जपणुकीसाठी दंतकथा दूरच ठेवा!

Next

जेव्हा एखाद्या बाळाचं आपल्या कुटुंबात आगमन होतं, तेव्हा त्याची नितांत काळजी घेण्याची आवश्यकता असते. बाळासाठी योग्य आणि सर्वोत्कृष्ट उपयुक्त उत्पादने निवडताना आईची खरी कसोटी लागते. मूल जन्माला आल्यानंतर घरात एक वेगळाच उल्हास आणि उत्साह असतो. त्यामुळे घरातील सर्वच सदस्य बाळाची काळजी घेत असतात. सदस्य बरेच असल्यानं मुलांना वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांसंदर्भातही सदस्यांचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो, एकाला वाटतं अमुक एक उत्पादन चांगलं, तर दुसऱ्या सदस्याला वाटतं तमुक उत्पादन चांगलं आहे. काही गोष्टींना प्राधान्य दिलं जातं, तर काही गोष्टींसंदर्भात कुटुंबातच मतभेद असतात. अशा वेळी बाळाची काळजी घेताना आईसुद्धा गोंधळून जाते. त्यासाठी कोणताही गोंधळ होऊ न देता बाळाच्या त्वचेसाठी निकोप असलेल्या उत्पादनांचा वापर केला पाहिजे. बाळाची काळजी घेण्यास सक्षम असलेल्या अशा उत्पादनांची निवड करणं आवश्यक आहे.

वैद्यकीयदृष्ट्या चाचणी घेतलेल्या उत्पादनांनी बाळाची सुरक्षा होईलच का?
कोणत्याही लॅबमध्ये उत्पादनांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी घेतली जाते. त्यामुळेच कोणत्याही ब्रँडच्या उत्पादनावर 'क्लिनिकली टेस्ट' असे लिहिलेले असते. परंतु अशा उत्पादनांनीही बाळाला काही वेळा ऍलर्जी होणे किंवा अंगावर पुरळ उठण्यासारखे प्रकार घडतात. बाळाला या उत्पादनांनी अपेक्षित लाभ होत नाही. त्यामुळे अशी उत्पादनं निवडताना बाळाला अ‍ॅलर्जी किंवा त्याची चिडचिड होणार नाही, याची काळजी घ्यावी. जॉन्सन बेबी केअर उत्पादनांवर अशा परिस्थितीत आपण मनापासून विश्वास ठेवू शकता, जे आपल्या बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यात सक्षम आहे. जॉन्सन बेबी केअर प्रॉडक्ट्सची संपूर्ण श्रेणी वैद्यकीय चाचणीनं प्रमाणित केलेली असते, जी शुद्ध, सुरक्षित आणि उपयुक्त ठरतात.

सुगंधाने बाळाच्या संवेदनशील त्वचेला नुकसान होण्याची शक्यता आहे?
नवजात जन्मलेल्या बाळाची गंध भावनेची क्षमता उत्तम असते. त्यामुळे बाळाला आनंदी ठेवण्यासाठी सुगंध असलेली पावडर फायदेशीर ठरते. तसेच सौम्य आणि हलकी सुगंध असलेली उत्पादनं वापरल्यास बाळाचा बौद्धिक विकास होतो. परंतु उग्र सुगंध हा बाळासाठी हानिकारकही ठरू शकतो. तसेच काही सौम्य सुगंधानंही बाळाला त्रास होऊ शकतो, त्यावेळी काळजी घेण्याची गरज असते. बाळासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या सुगंधाचे प्रमाणही निर्धारित केलेले असावे. सुगंधांची उत्पादनं आयएफआरए प्रमाणित केलेली असणं आवश्यक आहे. सर्व जॉन्सन बेबी केअर उत्पादनांमध्ये वापरल्या जाणार्‍या सुगंध आयएफआरए प्रमाणित आहेत.

बऱ्याचदा सुरक्षित उत्पादनं बाळाला फायदेशीर ठरतात. बाळासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांमध्ये अशा घटकांचा समावेश असावा जो बाळाच्या त्वचेला योग्य पोषण आणि सौम्यता प्रदान करतो. जॉन्सन बेबी केअर प्रॉडक्ट्सच्या संपूर्ण श्रेणीत फक्त त्या घटकांचा समावेश आहे, जी आपल्या बाळासाठी आवश्यक असतात. १२ महिन्यांच्या चाचणीनंतर ती एक उत्पादनाचा एक भाग बनली आहे. जॉन्सनची उत्पादनं पूर्णपणे हानिकारक रसायनांपासून मुक्त आहेत आणि आपल्या बाळाच्या निरोगी विकासास ती मदत करतात. त्याची सौम्यता प्रमाणित केलेली आहे.

बाळाची त्वचा निकोप राहण्यासाठी पाणी पुरेसे आहे काय?
बाळाची त्वचेच्या वरवरची घाण पाण्यानं स्वच्छ होत असली तरी बाळाची त्वचा पूर्णतः सुरक्षित करण्यासाठी वापरण्यात येणारा साबण फायदेशीर ठरतो. बाळाच्या त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी साबण महत्त्वाची भूमिका बजावतो, खरं तर साबणामुळेच बाळाची त्वचा मऊ आणि कोमल राहते. बाळासाठी वापरण्यात येणाऱ्या साबणामध्ये आवश्यक घटकांचा समावेश असणं गरजेचं असतं. जॉन्सनचा बेबी साबण हा व्हिटॅमिन ईनं परिपूर्ण असून, बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. जॉन्सन बेबी केअर प्रॉडक्ट्स देखील क्लिनिकला प्रमाणित आहे, त्यामुळे बाळाच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जॉन्सनचा बेबी साबण सुरक्षित ठरतो.

नैसर्गिक घटकांमध्ये बाळाच्या त्वचेसाठी काळजी घेणारे गुणधर्म असतात?
आपण बेबी पावडर, बेबी साबण वापरतो, त्यामध्ये किती प्रमाणात कोणत्या घटकांचं मिश्रण असतं हे तपासणं गरजेचं असतं. नैसर्गिक घटकांसह बाळाच्या त्वचेची काळजी घेणारे घटक उत्पादनांमध्ये आहेत की नाही हे पाहावं लागतं. बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी हे घटक सुरक्षित असू शकतात. त्यांच्यासाठी बाळाच्या त्वचेची काळजी घेण्याची गरज असते. त्यासाठी संबंधित चाचण्या पास करणे देखील आवश्यक आहे. जॉन्सनची बेबी केअर उत्पादने ही हानिकारक नसून रसायनमुक्त असतात, शिवाय ती आईप्रमाणेच बाळाची त्वचा निकोप, सुरक्षित ठेवतात.

Web Title: things you read while handling small babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.