केवळ अल्कोहोलच नाही तर 'या' ५ गोष्टी सुद्धा लिव्हरसाठी आहेत घातक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 11:01 AM2019-03-11T11:01:32+5:302019-03-11T11:01:48+5:30

अल्कोहोल म्हणजेच मद्यसेवनामुळे लिव्हर निकामी होतात हे तुम्ही नेहमी ऐकत किंवा वाचत असता. पण मद्यसेवनानेच लिवर खराब होतं असं नाही.

These 5 things are harmful for the liver besides alcohol | केवळ अल्कोहोलच नाही तर 'या' ५ गोष्टी सुद्धा लिव्हरसाठी आहेत घातक!

केवळ अल्कोहोलच नाही तर 'या' ५ गोष्टी सुद्धा लिव्हरसाठी आहेत घातक!

अल्कोहोल म्हणजेच मद्यसेवनामुळे लिव्हर निकामी होतात हे तुम्ही नेहमी ऐकत किंवा वाचत असता. पण मद्यसेवनानेच लिवर खराब होतं असं नाही. याला आणखीही काही गोष्टी कारणीभूत असतात. बदलत्या लाइफस्टाइलमुळे लोकांना सध्या वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. याच लाइफस्टाइलचा आणि खाण्या-पिण्याच्या सवयींचा लिव्हरवर सुद्धा परिणाम होतो. 

लिव्हरच्या समस्येपासून बचाव करताना कोणत्या वस्तूंचा उपयोग करताना काळजी पाहिजे याबाबत thehealthsite.com ने माहिती दिली आहे. लिव्हरच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये हे यात सांगण्यात आलं आहे.

जास्त साखरेचा वापर धोकादायक

बदलत्या जीवनशैलीमध्ये शुगरचा वापर भलेही कमी झाला असेल पण वेगवेगळ्या प्रकारचे शुगरचे खाद्य पदार्थांचं सेवन वाढलं आहे. असे खाद्य पदार्थ ज्यात फ्रोक्टोज आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असचं. जे लिव्हरसाठी चांगलं नसतं. 

फास्ट फूडमधील अजीनोमोटो घातक

फास्ट फूड आणि वेगवेगळ्या प्रकारचे फूड जे फार जास्त दिवसांसाठी सुरक्षित ठेवायचे असतात त्यात अजीनोमोटोचा वापर केला जातो. अजीनोमोटोमध्ये आढळणारं केमिकल मोनोसोडियम ग्लूटामेट लिव्हरमध्ये सूज येण्याचं आणि कॅन्सरचं कारण बनतं. त्यामुळे हे पदार्थ कमीच खावेत. 

डिप्रेशनची औषधं लिव्हरसाठी हानिकारक

डिप्रेशनची औषधं फार जास्त दिवसांसाठी लगोपाठ वापरल्याने लिव्हरवर वाईट परिणाम होतो. लिव्हरच्या आजारापासून वाचण्यासाठी फार जास्त काळासाठी डिप्रेशनच्या औषधींचा वापर करू नये.

पेनकिलर्सही लिव्हरसाठी हानिकारक

वेदना दूर करण्यासाठी अलिकडे पेनकिलरचा सर्रास वापर केला जातो. पण यांचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने लिव्हर डॅमेज होतं. यापासून वाचण्यासाठी पेनकिलरसारख्या औषधांचा वापर कमी करावा. 

ट्रान्स फॅट आणि लिव्हर

ट्रान्स फॅटमुळे वजन वाढण्यासोबतच लिव्हरला नुकसान पोहोचण्याचा धोका देखील असतो. ट्रान्स फॅटचं सतत सेवन केल्याने फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते. त्यामुळे लिव्हरच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी ट्रान्स फॅटचं सेवन कमी प्रमाणात करावं. 

अल्कोहोलचा लिव्हरवर खोलवर परिणाम

जास्त अल्कोहोलचं सेवन केल्याने लिव्हरवर सूज आणि लिव्हरवर सिरोसिससारख्या समस्या होऊ शकता. लिव्हरच्या समस्यांपासून स्वत:ला दूर ठेवायचं असेल तर अल्कोहोलचं सेवन बंद करा. अल्कोहोलने केवळ लिव्हरच खराब होतं असं नाही तर शरीरही कमजोर होतं. 
 

Web Title: These 5 things are harmful for the liver besides alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.