या ५ कारणांमुळे पुरुषांना जाणवतो अधिक थकवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 11:55 AM2018-10-05T11:55:02+5:302018-10-05T11:55:36+5:30

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये पुरुषांमध्ये आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या बघायला मिळत आहेत. यात सर्वात जास्त बघायला मिळणारी समस्या म्हणजे थकवा.

These 5 reasons men overly exhausted | या ५ कारणांमुळे पुरुषांना जाणवतो अधिक थकवा!

या ५ कारणांमुळे पुरुषांना जाणवतो अधिक थकवा!

googlenewsNext

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये पुरुषांमध्ये आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या बघायला मिळत आहेत. यात सर्वात जास्त बघायला मिळणारी समस्या म्हणजे थकवा. अनेक पुरुषांना सतत सुस्त वाटत राहतं. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. झोप पूर्ण न घेणे, तणावामुळे होणारा थकवा झोप पूर्ण घेतल्याने दूर होतो. पण थकवा हा एखाद्या आजारामुळे येत असेल तर यावर लगेच नियंत्रण मिळवणे सोपे नाही. शारीरिक आणि मानसिक थकवा आणि कमी ऊर्जा एखाद्या आजाराचं लक्षणही असू शकतं. चला जाणून घेऊ थकवा येण्याची वेगवेगळी कारणे....

टेस्टोस्टेरॉन

टेस्टोटेरॉन नावाच्या हार्मोनचा स्तर पुरुषांमध्ये तरुणपणात अधिक असतो. जसजसं पुरुषांचं वय वाढत जातं म्हणजे पुरुष ४० वय पार करतात तेव्हा टेस्टोस्टोरॉनचं प्रमाण दरवर्षी एक टक्क्याने कमी होतं. हे स्पष्टपणे सांगता येत नाही की, या हार्मोनचा स्तर कमी का होतो. पण वाढत्या वयासोबत याचं प्रमाण कमी होतं किंवा ह्यापोगोनाडिस्म सारख्या आजारानेही यांचं प्रमाण कमी होत असावं. टेस्टोस्टोरॉनचं प्रमाण कमी झाल्याने लैंगिक रुची कमी होते आणि झोपेसंबंधी समस्याही होतात. 

थायरॉडची समस्या

थायरॉड हार्मोनचं प्रमाण कमी झाल्यानेही शरीरातील ऊर्जेचा स्तर बिघडतो. सामान्यपणे थायरॉयडची समस्या ही महिलांमध्ये अधिक बघायला मिळते. पण ही समस्या पुरुषांमध्येही आहे.  पुरुषांनाही ही समस्या होत असेल तर वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. 

डिप्रेशन

डिप्रेशनची समस्या आजच्या लाइफस्टाईलमध्ये कुणालाही होऊ शकते. डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये निराशा, सुस्त राहणे, झोप न येणे, कोणत्याही कामात लक्ष न लागणे आणि ऊर्जा कमी होणे ही असू शकतात. ज्यांनाही ही समस्या असेल त्यांनी वेळीच यावर उपाय करायला हवा नाही तर समस्या गंभीर रुप घेऊ शकते. डिप्रेशनने ग्रस्त व्यक्ती आत्महत्याही करु शकते. 

झोपसंबंधी आजार

झोन न येण्यानेही थकवा येतो. कमी ऊर्जा असण्याला झोप पूर्ण न होणे हेही एक महत्त्वाचं कारण आहे. तुम्ही नाइट शिफ्ट करत असाल किंवा रात्री जास्त वेळ जागत असाल तर ही समस्या होऊ शकते. 

व्यायाम आणि योग्य आहाराची कमतरता

व्यायाम न केल्याने आणि योग्य आहार कमी घेतल्यानेही थकाव आणि ऊर्जेची कमतरता येते. नियमीत रुपाने व्यायाम केल्याने झोप चांगली येते आणि जीनवशैलीतही सुधारणा होते. योग्य आणि पौष्टीक आहार सर्वात महत्त्वाचा आहे. रोज जेवणात धान्य, ताजी फळे, भाज्या आणि प्रोटीनचा समावेश करावा. तसेच रोज भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.
 

Web Title: These 5 reasons men overly exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.