सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होण्याला तुमच्या 'या' ५ सवयी ठरतात कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 06:22 PM2020-06-04T18:22:59+5:302020-06-04T18:48:38+5:30

रोजच्या काही चुकांमुळे तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असतो.

These 5 mistakes after waking can affect your stool | सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होण्याला तुमच्या 'या' ५ सवयी ठरतात कारणीभूत

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होण्याला तुमच्या 'या' ५ सवयी ठरतात कारणीभूत

Next

सकाळी उठल्यानंतर काही मिनिटांनी शौचास जाऊन आल्यानंतर दिवसाची सुरूवात होत असते. पण तुम्हाला माहिती आहे का अनेक लोक असे आहेत. जे सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी किंवा तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करतात. जेणेकरून पोट चांगलं साफ होईल. काहीजण पोट साफ होण्यासाठी रात्री चुर्ण खाऊन झोपतात. तर काहीजण औषध घेतात.

ही समस्या गॅसमुळे किंवा होते. या समस्येला बद्धकोष्टता असं म्हणतात. रोजच्या काही चुकांमुळे तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागत असतो. आज आम्ही तुम्हाला या सवयींबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्हाला पोट साफ न होण्याची समस्या उद्भवणार नाही. 

रात्री उशीरापर्यंत जागणं

सध्याच्या जीवनशैलीत अनेकजण वेळेवर न झोपता रात्री उशीरा झोपून सकाळी उशीरा उठतात. त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. बॉडी क्लॉक बिघडतं म्हणून पोट साफ होण्यास त्रास होतो. 

व्यायाम न करणं

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत वेळेचा अभाव जाणवतो. त्यामुळे लोकांची शारिरीक हालचाल पुरेशी होत नाही. त्यामुळे पचनशक्ती मंदावते. म्हणून सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही.

धुम्रपान करणं

धुम्रपान करण्याची  सवय मोठ्या प्रमाणात  दिसून येते. त्यामुळे फक्त फुफ्फुसं खराब होत नसून पचनशक्तीवरही परिणाम होतो. म्हणून पोट साफ होण्यास अडचड येते.

कमी पाणी पिणं

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा कमी पाणी पिता तेव्हा स्टूल हार्डची समस्या उद्भवते.  गंभीर स्थितीत मुळव्याध सुद्धा होऊ शकतो. म्हणून दररोज ८ ते १० ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. तसंच ही समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करा. ताणतणाव मुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

सकाळी नाष्ता न करणं

साधारणपणे अनेकजण  सकाळी नाष्त्यासाठी चहा, कॉफी ब्रेड बटर असे पदार्थ खातात. त्यामुळे नकळतपणे आरोग्याचं मोठं नुकसान होतं. जर तुम्हाला पोट साफ होण्याच्या समस्येपासून वाचवायचं असेल तर सकाळी हेल्दी नाष्ता करायला हवा. आहाराच प्रोटिन्स, फायबर्सने परिपुर्ण असलेल्या पदार्थाचा समावेश करावा.  बाहेरचे पदार्थचे, पॅक्ड फुड, जास्त तेलकट, गोड पदार्थाचा आहारात समावेश करू नका.

पावसाळयात थंडी वाजून ताप येणं, 'या' गंभीर आजाराचं असू शकतं लक्षण;आधीच जाणून घ्या उपाय

कोरोना रुग्णांची खोली आणि गर्दीपेक्षाही जास्त धोकादायक आहे; 'हे' ठिकाण, वेळीच व्हा सावध

Web Title: These 5 mistakes after waking can affect your stool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.