जास्त व्यायाम करत असाल तर इटिंग डिसॉर्डर होण्याचा असतो धोका, रिसर्चमधून खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 02:45 PM2020-02-04T14:45:26+5:302020-02-04T14:48:53+5:30

फिटनेससाठी व्यायाम खूप महत्वाचा असतो.

Study says eating disorders linked to exercise addiction | जास्त व्यायाम करत असाल तर इटिंग डिसॉर्डर होण्याचा असतो धोका, रिसर्चमधून खुलासा...

जास्त व्यायाम करत असाल तर इटिंग डिसॉर्डर होण्याचा असतो धोका, रिसर्चमधून खुलासा...

Next

फिटनेससाठी व्यायाम खूप महत्वाचा असतो. पण हाच व्यायाम जास्त प्रमाणात केल्यामुळे शरीराचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. आज आम्ही तुम्हाला व्यायामामुळे कोणत्या नकारात्मक गोष्टी होत असतात यांबद्दल सागंणार आहोत. एका रिसर्चनुसार व्यायामाच्या सवयीला आता इटिंग डिसॉर्डरशी जोडले जात आहे. रिसर्चकर्त्यांच्या मते ज्यांना इटिंग डिसॉर्डर ज्यांना असतो असे लोक व्यायाम जास्त करतात. 

ब्रिटनमधिल एंग्लिया रसकिन यूनिवर्सिटीचे प्रमुख लेखक माईक ट्रॉट यांनी या विषयावर आधारित संशोधन केले. खाण्यापिण्याची सवय आणि व्यायाम करण्याची पद्धत या एकमेकांशी निगडीत असलेल्या गोष्टी आहेत हे मांडले. रिसर्चकर्त्यांच्यामते इटिंग डिसॉर्डर आणि व्यायाम करण्याची सवय असणे यांमध्ये कनेक्शन आहे. हा शोध इटिंग आणि वेट डिसॉर्डर या पुस्तकात प्रकाशित करण्यात आला आहे.  ब्रिटनमध्ये राहत असलेल्या २५ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या २ हजार १४० लोकांचा समावेश रिसर्चसाठी  करण्यात आला होता. त्यात ३.७ टक्क्यांपेक्षा जास्त लोकं हे जास्त व्यायाम करणारे  दिसून आले. 

ट्रॉट यांचामते हेल्दी लाईफस्टाईलसाठी व्यायम करण गरजेचं आहे. पण कोणत्याही गोष्टीला अतिप्रमाणात करणं शरीरासाठी घातक ठरत असतं. कारण खाण्यापिण्याची असो अथवा व्यायामाची सवय कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो. ( हे पण वाचा-शरीरात रक्ताच्या गाठी होऊ नये यासाठी सर्वात बेस्ट उपाय, जाणून घ्या काय खावं...)

रिसर्चकर्त्यांच्यामते इटिंग डिसॉर्डर आणि व्यायामाचं एडिक्शन असणं हे  कोणत्याही व्यक्तीची शारीरिक आणि मानसीक स्थिती खराब होण्याचा धोका असतो.  स्ट्रेस आणि डिप्रेशनमध्ये असणारे लोक इटिंग डिसॉर्डरने प्रेरित झालेले असतात.  अशा लोकांनी आपल्या व्यायाम करण्याच्या पद्धतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हाडांमध्ये फॅक्चर आणि अंगदुखी तसंच कार्डीओवॅस्क्युलर आजार होण्याचा धोका असतो. (हे पण वाचा-World Cancer Day : कॅन्सरची लक्षणं आधीच माहीत असतील तरच टाळता येईल मृत्यूचा धोका!)

Web Title: Study says eating disorders linked to exercise addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.