(Image Credit : goodeggs.com)

कांद्याचे भाव आता इतके वाढले आहे की, लोकांच्या खाण्यातून कांदा गायब व्हायला आलाय. पण तरी कांद्याचे फायदे काही कमी होत नाहीत. कांद्याने आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला चांगलेच माहीत असतील. जसे कांद्याचे आरोग्याला फायदे आहेत तसेच कांद्याच्या पातीचेही आरोग्याला कितीतरी फायदे होतात. पण याकडे फारसं कुणी लक्षच देत नाही. हिवाळ्यात कांद्याची पात भरपूर येते. त्यामुळे या दिवसात कांद्याची पात खाणे अनेकदृष्टीने फायदेशीर ठरते. याचे काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हृदयासाठी फायदेशीर

कांद्याच्या पातीमधील अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स तत्व डीएनए आणि सेल्स टिशूंचं होणारं डॅमेज रोखते. तसेच यातील व्हिटॅमिन सी कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगरचं प्रमाण कमी करण्यासही मदत करतं. ज्यामुळे तुम्हाला हृदयासंबंधी आजारांचा धोका कमी राहतो. त्यामुळे नियमित कांद्याच्या पातीचं सेवन करणं गरजेचं आहे.

हाडे होतात मजबूत

कांद्याच्या पातीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात ज्याने शरीरातील हाडे मजबूत राहण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सी हाडांमुळे कोलेजन वाढवत त्यांना मजबूत करतात. तर यानेच बोन डेन्सिटी मेन्टेन ठेवण्यासही मदत मिळते. अलिकडे वेगवेगळ्या कारणांनी हाडे कमजोर होत आहेत. अशात कांद्याच्या पातीचा तुम्हाला फायदा मिळू शकतो.

वायरल तापापासून बचाव

(Image Credit : parenting.firstcry.com)

अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-वायरस तत्त्व असलेल्या कांद्याची पातीने फ्लू, इन्फेक्शन आणि वायरलच्या व्हायरसपासून शरीराची रक्षा केली जाते. तसेच याने श्वसन तंत्रही हेल्दी राहतं. त्यामुळे नियमित होणाऱ्या समस्या होत नाहीत.

डोळे राहतात हेल्दी

(Image Credit : evyahospitals.com)

कांद्याच्या पातीमध्ये ल्युटीन आणि जक्सॅथीन सारखे कारोटेनोइड असतात. ज्याने डोळे निरोगी राहण्यास मदत मिळते. यानेच डोळ्यांची दृष्टीही सुधारते. त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी तरी नियमित कांद्याच्या पातीचं सेवन करावं.

कॅन्सरचा धोका होतो कमी

कांद्याच्या पातीमध्ये एलिल सल्फाइड नावाचं शक्तीशाली सल्फर कम्पाउंड असतं. जे  कोलोन कॅन्सर रोखण्यात मदत करतात. याचे फ्लेवोनोइड्स तत्व जॅन्थीन ऑक्सिडेस एन्जाइमची शरीरात निर्मिती करते, ज्याने डीएनए आणि सेल्सचं होणारं नुकसान टाळता येतं.

शुगर लेव्हल कमी करेल

वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, कांद्याच्या पातीमधील सल्फर कम्पाउंड शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यास मदत करते. याने इन्सुलिनचं प्रमाण वाढून रक्ताच्या माध्यमातून बॉडी सेल्सपर्यंत शुगर चांगल्या प्रकारे पोहोचून चांगला रिझल्ट मिळतो. 


Web Title: Spring onion benefits for body and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.