घामाच्या दुर्गंधीपासून झटपट सुटका मिळवण्याचे खास उपाय, दूर पळणार नाहीत लोक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 15:52 IST2021-06-30T15:52:02+5:302021-06-30T15:52:40+5:30
अधिक घाम येणे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे अति प्रमाणात घाम देखील येऊ शकतो. जाणून घेऊया जास्त घामापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय.

घामाच्या दुर्गंधीपासून झटपट सुटका मिळवण्याचे खास उपाय, दूर पळणार नाहीत लोक!
अधिक घाम येणे अनेक कारणांमुळे होऊ शकते, जसे की विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या संसर्गामुळे अति प्रमाणात घाम देखील येऊ शकतो. हृदयाच्या झडपामध्ये जळजळ, हाडांशी संबंधित संक्रमण तसेच एचआयव्ही संसर्ग देखील असू शकतो. कोणतेही काम आणि व्यायामाशिवाय जास्त घाम येणे हृदयविकाराची चिन्हे असू शकते. तणाव, चिंता आणि भीतीमुळे अत्यधिक घाम येणे देखील होऊ शकते. जाणून घेऊया जास्त घामापासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाय.
तुम्हाला इतर व्यक्तींच्या तुलनेने जर जास्त घाम येत असेल तर भरपूर पाणी प्या. असे केल्याने तुमच्या शरीरात पाण्याची योग्य पातळी नियंत्रित राहिल. भरपूर पाणी प्यायल्याने हायपरडायड्रोसिसचा त्रास होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो. तसेच तुम्ही दहि, कैरीचे पन्हं, ज्यूस, छास पिऊ शकता.
सॉफ्ट ड्रिंक्स टाळा
सॉफ्ट ड्रिंक्समुळे तुम्हाला थोड्यावेळासाठी बरे वाटते पण सॉफ्ट ड्रिंक्स शरीरासाठी घातक असतात. त्याएवजी तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवत रहा. साबणाचा वापर करू नका.
डेरी उत्पादने
तुम्ही डेरी उत्पादनांचा जास्त वापर केलात तर तुम्हाला ब्लॅक हेड्स, मुरुमांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी करा. दुध जास्त असणारी चहा, कॉफी टाळा त्या एवजी सोया किंवा बादाम मिल्क प्या.
फेसपॅक वापरा
घामामुळे त्वचा ऑईली होत असेल तर - त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती किंवा चंदनाचा फेस पॅक वापरू शकता. आठवड्यातून दोन वेळा हे मास्क चेहऱ्यावर लावा. यातील पोषक घटकांमुळे त्वचेचा तेलकटपणा कमी होण्यास मदत मिळते. त्वचा टॅन झाली असल्यास कच्चे दूध, मुलतानी माती आणि हळद एकत्रित पॅक तयार करून चेहऱ्याला आणि हातांनाही लावा. यामुळे टॅनिंग कमी होतं आणि रंग उजळण्यास मदत मिळेल.
बर्फ आणि सनस्क्रीनचा वापर करा
तुम्ही चेहऱ्यावर बर्फ चोळु शकता. यामुळे तुमच्या त्वचेची छिद्र बंद होऊन त्वचा टाईट होते. घरातून बाहेर निघण्यावेळी ३० मिनिटं आधी तुम्ही सनस्क्रीन लावू शकता.