शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

नाजूक जागेचं दुखणं वाढू नये म्हणून मुळव्याध झाल्यावर खाऊ नका 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 10:53 AM

ही समस्या महिलांना आणि पुरूषांमध्येही  २० ते ५० या वयोगटात सर्वाधिक उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

खालेल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर उरलेले अन्न मलावाटे शरीराच्या बाहेर टाकण्यात येतं.  पण रोजची ही क्रिया करताना जर तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ही क्रिया करत असताना खूप दुखण्याचा त्रास होत असतो. ही समस्या महिलांना आणि पुरूषांमध्येही  २० ते ५० या वयोगटात सर्वाधिक उद्भवते. अशा स्थितीत तुम्ही आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अनियमीत आणि चुकीच्या अन्नपदार्थांचे तसंच मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे मुळव्याधाची समस्या उद्भवत असते. व्यायाम न केल्यामुळे मुळव्याधाची समस्या सगळ्यात जास्त जाणवत असते.

(image credit- medical news today)

मुळव्याधाच्या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.  मुळव्याधाची  समस्या उद्भवल्यानंतर तुम्हाला फक्त मल बाहेर टाकतानाच नाही तर बसताना आणि उठताना सुद्धा त्रास होत असतो. गुदभागी भेगा, चिरा पडलेल्या असतात व त्यामुळे कात्रीने कापल्याप्रमाणे तीव्र वेदना होत असतात. यामध्ये वेदना तर असतातच, पण आगही खूप होते आणि मलाबरोबर रक्तही पडते.ही समस्या सहजासहजी कोणाला सांगता येण्यासारखी नसते. त्यासाठी आहारातून काही पदार्थ वगळून तुम्ही या समस्येपासूनस्वतःला दूर ठेवू शकता. 

(image credit-.pristyncare.com)

लाल मिरचीचे सेवन करू नका

(image credit-amazon.in)

मुळव्याध असलेल्या लोकांना लाल मिरचीचे सेवन आहारातून वगळायला हवे. कारण त्यामुळे जळजळ जास्त प्रमाणात होऊ शकते. म्हणून जास्त तिखट पदार्थ खाऊ नका.

बाहेरचं खाऊ नका

मुळव्याध झाल्यानंतर बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा कारण त्या पदार्थांध्ये  मीठ, मसाल्यांचे प्रमाण अधिक असते. स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाही. 

फायबर्सचा आहारात समावेश करा

(image credit-miachel kummar)

गरम पाणी, ताक, ज्वारीची किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी, मूग, मुगाची डाळ, जुना तांदूळ, सातू. उकडलेल्या पालेभाज्या, पपई, गोड द्राक्षं, सफरचंद, ताडफळ, काळ्या मनुका यांचा आहारात समावेश करा. जेणेकरून पोट साफ होण्यासाठी त्रास होणार नाही आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. ( हे पण वाचा-विणकाम केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, महिलांचं टेन्शन 'असं' होईल दूर!)

मादक पदार्थाचे सेवन

अनेकांना सिगारेट, गुटखा आणि दारूचे अतिप्रमाणात सेवन करण्याची सवय असते. त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परीणाम होत असतो.  त्यामुळे मुधव्याधाची समस्या वाढत जाण्याचा धोका असतो. त्यामुळे मादक पदार्थांचं सेवन करू नका. ( हे पण वाचा-२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य