शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी दुपारची झोप आवश्यक - रिसर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:51 PM

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर थोडासा वेळ काढून झोप घेणयाची संधी मिळाली तर त्याहून दुसरं सुख नाही. परंतु, सध्या लोकांचा संपूर्ण दिवस एवढा हेक्टिक असतो की, झोपण्याची संधी मिळतच नाही.

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये जर थोडासा वेळ काढून झोप घेणयाची संधी मिळाली तर त्याहून दुसरं सुख नाही. परंतु, सध्या लोकांचा संपूर्ण दिवस एवढा हेक्टिक असतो की, झोपण्याची संधी मिळतच नाही. पण काही दिवसांपूर्वी करण्यात आलेलं संशोधन तुम्हाला तुमच्या बीझी शेड्यूलमधून थोडासा वेळ झोपेसाठी काढण्यासाठी तयार करू शकतं. कारण या नव्या संशोधनातून दुपारच्या वेळी थोडा वेळ झोपल्यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी होतं आणि तुम्हाला हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोकाही कमी होतो. 

संशोधनानुसार, दुपारच्या वेळी थोडा वेळ झोपल्याने तुमचं ब्लड प्रेशर दुपारी न झोपणाऱ्यांच्या तुलनेत कमी असतं. संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, दुपारी थोडा वेळ झोपल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम घडतात. हा परिणाम ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी असलेल्या औषधांप्रमाणेच असतात. दरम्यान, या संशोधनासाठी 62 वर्षांच्या 212 लोकांची माहिती एकत्र केली. ज्यामार्फत असं समजलं की, जास्तीत जास्त लोकांचे ब्लड प्रेशर 130 mm Hg होतं. अमेरिकन हार्ट असोसिएशन गायडंसनुसार, सामान्य ब्लड प्रेशर 120 mm Hg किंवा त्यापेक्षा कमी असतं. संशोधना दरम्यान या 212 लोकांमधील काही लोकांना दुपारी झोपण्यास सांगण्यात आले, तर काहींना न झोपण्यास सांगितले. 

संशोधनातून सिद्ध झालेल्या निष्कर्षांनुसार, ज्या व्यक्ती दिवसा 49 मिनिटांपर्यंत झोपतात, त्यांचं ब्लड प्रेशर 5mm/hg पर्यंत कमी होतं. एवढचं ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरची औषधं खाल्यानेही कमी होऊ शकतं. परंतु, जर थोडासा वेळ दिल्याने ब्लड प्रेशरची समस्या दूर होणार असेल तर औषधं घेण्याची गरजच भासत नाही. 

संशोधनाचे मुख्या संशोधक कॅलिसट्राटोस यांच्यानुसार, जर आपलं ब्लड प्रेशर 2mm hg पर्यंत कमी होतं असेल, तर हृदयाच्या अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.संशोधनाचे महत्त्व याच गोष्टीमुळे समजण्यास मदत होते की, अमेरिकेतील एकूण लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असून त्यांना हार्ट स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका अधिक आहे. तसेच भारतामध्ये प्रत्येक आठ व्यक्तींपैकी एक व्यक्ती हाय ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त आहे.

परंतु, ब्रिटिश हार्ट फाउंडेशनचे डॉक्टर सोन्या बाबू नारायण या संशोधनाशी सहमत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की, उत्तम आणि शांत झोप आवश्यक आहेच, पण अनेक संशोधनांमधून असं सिद्ध झालं आहे की, जर आपण आपल्या खाण्यामध्ये मीठाचा वापर कमी प्रमाणात केला त्याचबरोबर एक्सरसाइज आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवा. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या समस्येपासून सुटका करणं सहज शक्य होतं. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHeart Diseaseहृदयरोग