सावधान! 'या' गोष्टीमुळे होऊ शकतो तुम्हाला मायग्रेन, तुम्हाला आहे का ही समस्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 11:35 AM2019-12-20T11:35:39+5:302019-12-20T11:35:44+5:30

या रिसर्चचं महत्व यासाठी अधिक आहे कारण आतापर्यंत तणाव आणि इतर मानसिक-शारीरिक स्थितींनाच मायग्रेनचं कारण मानलं जात होतं.

Sleep disturbances can trigger migraine headaches | सावधान! 'या' गोष्टीमुळे होऊ शकतो तुम्हाला मायग्रेन, तुम्हाला आहे का ही समस्या?

सावधान! 'या' गोष्टीमुळे होऊ शकतो तुम्हाला मायग्रेन, तुम्हाला आहे का ही समस्या?

googlenewsNext

(Image Credit : medicalnewstoday.com)

झोप आणि नर्वस सिस्टीमसंबंधी समस्यांमध्ये काय संबंध आहे? याबाबत अधिक जाणून घेताना अभ्यासकांना आढळलं की, जर रात्री झोपताना सतत काही समस्या येत असेल किंवा झोपेत अडथळा निर्माण होत असेल किंवा तुम्हाला चांगली झोप लागत नसेल तर तुम्हाला मायग्रेनची समस्या होऊ शकते. या रिसर्चचं महत्व यासाठी अधिक आहे कारण आतापर्यंत तणाव आणि इतर मानसिक-शारीरिक स्थितींनाच मायग्रेनचं कारण मानलं जात होतं.

(Image Credit ; migraineagain.com)

न्यूरॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये सांगण्यात आले आहे की, जर एखादी व्यक्ती वेळेआधीच बेडवर जात असेल आणि ८ तास बेडवर पडून राहत असेल, त्याला झोप येत नसेल तर अशा स्थितीत त्या व्यक्तीला मायग्रेनचा सामना करावा लागू शकतो. खास बाब ही आहे की, वेदना त्याच दिवशी होईल हे गरजेचं नाही. मायग्रेनमध्ये होणाऱ्या वेदना १ ते २ दिवसांनी देखील होऊ शकतात.

ब्रिघम अ‍ॅन्ड वुमेन हॉस्पिटलचे डॉक्टर आणि या रिसर्चचे सह-लेखक सुजेन बेर्टिश म्हणाले की, 'झोप आणि मायग्रेनशी संबंधित या रिसर्चमधून समोर आले आहे की, लो स्लीप क्वालिटी किंवा अजिबात झोप न येणे याने दुसरा दिवसच खराब होतो असं नाही तर काही दिवसांनी याचा प्रभाव दिसू लागतो. माझ्याकडे मायग्रेनचे असे रूग्ण नेहमी येतात, ज्यांना इनसोमनियाची समस्या असते. डॉक्टरांसमोर प्रश्न उभा राहतो की, त्यांच्या मायग्रेनच्या रूग्णावर उपचार कसे करावे. याबाबत सध्या जास्त माहिती उपलब्ध नाही'. 

रिसर्चमधून हे सुद्धा सिद्ध होतं की, रात्री पुरेशी झोप न घेतल्याने सकाळी मायग्रेन होण्याचा धोका अधिक राहतो. पण  दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीही व्यक्तीला मायग्रेन होऊ शकतो. यापासून बचाव करण्यासाठी गरजेचं आहे की, रात्रीची झोप खराब करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅक्टिविटीपासून दूर रहा.


Web Title: Sleep disturbances can trigger migraine headaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.