वजन कमी करताना रात्री भात न खाण्याचा सल्ला दिला जातो, तो योग्य की अयोग्य? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 01:21 PM2022-05-17T13:21:08+5:302022-05-17T13:23:41+5:30

काही लोकं फ्राईड राईस, काहीजण राजमा आणि भात तर काही जण छोले व भात खातात. भातामध्ये कार्बोहायट्रेड्स असतात. त्यासोबतच प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. तरीही अनेकांच्या मनात असा प्रश्न येतात की, रात्री भात खाणे योग्य की अयोग्य?

should you eat rice if you are trying to loose weight know the truth | वजन कमी करताना रात्री भात न खाण्याचा सल्ला दिला जातो, तो योग्य की अयोग्य? घ्या जाणून

वजन कमी करताना रात्री भात न खाण्याचा सल्ला दिला जातो, तो योग्य की अयोग्य? घ्या जाणून

googlenewsNext

भारतात विशेषत: किनारपट्टीवरील राहणाऱ्या लोकांचं भात हे मुख्य अन्न आहे. काहीजणांना तर भात खाल्ल्याशिवाय चैनच पडत नाही. लोक भाताचं सेवन वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोकं फ्राईड राईस, काहीजण राजमा आणि भात तर काही जण छोले व भात खातात. भातामध्ये कार्बोहायट्रेड्स असतात. त्यासोबतच प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. तरीही अनेकांच्या मनात असा प्रश्न येतात की, रात्री भात खाणे योग्य की अयोग्य?

कार्बोहायट्रेडचा मुख्य स्त्रोत
भातात मोठ्या प्रमाणात कार्बोहायट्रेड असते. कार्बोहायट्रेडमुळे आपल्याला उर्जा मिळते ज्यामुळे आपण रोजची कार्य सुरळीत पार पाडू शकतो. 

पचन व्यवस्थित होण्यासाठी फायद्याचे
भात पोटाच्या आजारांना लांब ठेवतो. भातामुळे पचन व्यवस्थित होते. वाफवलेला भात पचायला हलका असतो. भातामुळे पोटदुखी, अपचन या समस्या दुर होतात. डॉक्टर पोटाचे आजार झाल्यास दही-भात खाण्याचा सल्ला देतात. भात कमजोर पाचनतंत्र सुधारते. पचन व्यवस्थित झाल्यामुळे पोषण तत्व संपूर्ण शरीरापर्यंत पोहचतात.

भात खाण्याचे तोटे
जर तुम्ही वजन कमी करत असाल तर भाताने तुमचे वजन वाढु शकते. भातात कार्ब्स असतात. त्यामुळे विशेषत: रात्री भात खाणे टाळावे. रात्री शक्यतो ब्राऊन राईसचे सेवन करावे. त्यामुळे तुम्हाला कार्ब्स एवजी प्रोटीन्स आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळते.

Web Title: should you eat rice if you are trying to loose weight know the truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.