शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 15:41 IST

सफरचंदामध्ये अनेक उत्तम पोषकतत्त्वं असतात. आरोग्याच्या दृष्टीने सर्व फळांमध्ये सफरचंद हे फळ फायदेशीर मानले जाते.

ठळक मुद्देसफरचंदामध्ये शरीरासाठी पौष्टिक गुणधर्म असतात सफरचंदामुळे पचनप्रक्रिया सुधारतेशारीरिक समस्यांवर गुणकारी सफरचंद

शारीरिक आरोग्य निरोगी आणि सुदृढ राहावे, यासाठी नियमित एक तरी सफरचंद खाल्ले पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात. पण, चकाकणारे सफरचंद खाणे आरोग्यासाठी हानिकारक की फायदेशीर आहे, या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. जाणून घेऊया याचे उत्तर...1. खाण्यापूर्वी सफरचंदाची साल काढावी का?‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा’, अशी म्हण आहे. शक्यतो आपण सफरचंद त्याच्या सालासकटच खातो. पण हल्ली हल्ली फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशके आणि  फळांच्या आवरणाची चकाकी टिकून राहण्यासाठी त्यावर लावण्यात येणाऱ्या मेणाच्या लेपामुळे सध्या फळे सालासकट खावीत की नाही?, हा सध्या चर्चेचा मुद्दा बनला आहे. फळांवर फवारण्यात येणारी कीटकनाशकं आणि मेणाचा थर आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असतात, ही बाब मान्य आहे. पण काही फळांच्या सालामध्येही पोषकतत्त्वे असतात, ही तत्त्वे टिकून राहावी, यासाठी कीटकनाशकं फवारणे आवश्यक असते ही गोष्टदेखील आपण विचारात घेतली पाहिजे. तरीही सफरचंद सालासकट खावे की खाऊ नये?, हाच विचार अजूनही तुमच्या डोक्यात आहे का?. टेन्शन घेऊ नका. यासंदर्भात आणखी काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊया...

2. सफरचंद कसे खावे? बहुतांश वेळा, सफरचंदावर कीटकनाशकं फवारलेली असतात, त्यामुळे ते तसेच खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सफरचंद खाण्यापूर्वी ते स्वच्छ धुवावे आणि एक तासासाठी पाण्यात भिजत ठेवावे. यानंतर त्यावरील कीटकनाशक काढण्यासाठी कोमट पाण्यात दोन ते तीन वेळा सफरचंद धुवावे. याद्वारे तुम्हाला फळांची खरी चव चाखता येते आणि शरीराला जास्तीत जास्त फायदेही मिळतात. 

3. सफरचंदाचे साल फायबरयुक्तसफरचंदाचे साल हे फायबरयुक्त (तंतूमय पदार्थ) असते. सालासकट सफरचंदाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो. शिवाय, यामुळे तुम्हाला सारखी भूकदेखील लागत नाही आणि कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत करते. 

4. जीवनसत्त्वाची मात्रा असते अधिकसफरचंदाच्या सालामध्ये जीवनसत्त्व 'क' आणि 'अ' चे प्रमाण अधिक असते. एका सफरचंदाच्या सालामध्ये 8.4 mg जीवनसत्त्व 'क' आणि 98 IU जीवनसत्त्व 'अ' चे सरासरी प्रमाण असते. त्यामुळे सफरचंदाची साल काढून खाल्ल्यास नुकसान आपलेच आहे. कारण यामध्ये प्रचंड प्रमाणात असणारी जीवनसत्त्वंही आपण केराच्या टोपलीत फेकतो.

5. कर्करोग (Cancer) नियंत्रित करते सफरचंदाच्या सालामध्ये भरपूर प्रमाणात Triterpenoid (ट्रायटरपेनॉइड) नावाचे पोषकतत्त्व असते. हे पोषकतत्त्व शरीरातील कर्करोगाच्या पेशींचा खात्मा करतात. शिवाय, यामध्ये अॅन्टीऑक्सिडन्ट्सचेही प्रचंड प्रमाण असते, त्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो.

6.  श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुलभ होते सफरचंदाच्या सालामध्ये Quercetin (रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे तत्त्व) नावाचं फ्लॅव्हनॉईड असते. यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुधारते.  जी लोक आठवड्यातून 5 किंवा त्याहून अधिक सफरचंद खातात, त्यांची श्वसनप्रणाली अधिक चांगल्या पद्धतीनं कार्य करते. 

7. वजन नियंत्रणात आणते जर तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं वजन घटवायचे असेल तर सालासकट सफरचंद खा. यामध्ये असलेले Ursolic अॅसिड लठ्ठपणाविरोधात लढते. यामुळे स्नायूंचे फॅट्स वाढतात पण कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. एकूणच वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

8. पोषकतत्त्वयुक्त सफरचंदसफरचंदाच्या सालामध्ये पोटॅशिअम, कॅलशिअम, फॉलेट, लोह आणि फॉसफरस ही पोषकतत्त्वे असतात. शरीराचे सर्व कार्यपद्धती सुरळित पार पडावी, यासाठी ही पोषकतत्त्वे महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतात.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स