रुजुता दिवेकर सांगयात थंडीत हेल्दी राहण्याचं सिक्रेट, 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 16:37 IST2021-12-08T16:37:09+5:302021-12-08T16:37:21+5:30
जर तुम्ही विचार करत असाल की, हिवाळ्याच्या काळात आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, तर अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर हिवाळ्यात आहारात समावेश कराव्यात अशा ५ गोष्टी शेअर केल्या आहेत.

रुजुता दिवेकर सांगयात थंडीत हेल्दी राहण्याचं सिक्रेट, 'या' गोष्टींचा आहारात समावेश करा
हिवाळ्यात अनेक आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध होतात. संपूर्ण बाजारपेठ हिरव्या भाज्यांनी सजते. यासोबतच गुळापासून तीळापर्यंत सर्व गरमागरम पदार्थ मिळू लागतात. जे फक्त चवीलाच चांगले लागत नाहीत तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतात.
बरेच लोक हिवाळ्यात खूप चहा आणि कॉफी पिण्यास सुरवात करतात. परंतु या ऋतूचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, आपण हिवाळ्यातील काही खास खाद्यपदार्थ खावेत. ताज्या पालेभाज्यांपासून ते व्हिटॅमिन सी-पॅक केलेल्या संत्र्यांपर्यंत, तुमच्या प्लेटमध्ये काही गोष्टी असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही विचार करत असाल की, हिवाळ्याच्या काळात आहारात कोणते पदार्थ समाविष्ट करावेत, तर अलीकडेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर हिवाळ्यात आहारात समावेश कराव्यात अशा ५ गोष्टी शेअर केल्या आहेत.
रुजुता दिवेकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शेअर केले की ऊस लीव्हरसाठी चांगले आहे. उसामुळे हिवाळ्यात त्वचा चमकदार ठेवतो. हिवाळ्यात उसाचा रस पिणे अत्यंत आरोग्यदायी आहे. उसाच्या रसामध्ये भरपूर फायबर असते, जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते. तसेच, ऊस शरीरातील चयापचय वाढवण्यास मदत करतो.
मनुका रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. हिवाळ्याच्या हंगामात अनेकदा आजारी पडणाऱ्या मुलांसाठी मनुका उत्तम आहे. तुम्ही तुमच्या स्नॅकमध्ये किंवा फ्रूट सॅलडमध्ये मनुका घालू शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे त्वचेसाठी उत्तम असतात. अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढा देतात, पेशींचे नुकसान टाळतात. हे वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात.
रुजुता दिवेकर सांगतात की चिंच ही एक उत्तम पाचक आहे, अगदी त्याच्या बिया ताकात मिसळूनही उत्तम पेय तयार होतं.
आवळा हिवाळ्याचा राजा आहे. आवळा संसर्गाशी लढण्यास मदत करतो. तो च्यवनप्राश, सरबत किंवा मुरांबा या स्वरूपात देखील खाता येते.
तिळगुळ हिवाळ्यात भरपूर खाल्ला जातो, त्यात आवश्यक फॅट्स असतात. तिळगुळ हाडांसाठी आणि सांध्यासाठी खूप चांगला आहे.