थंडीमुळे काकडी खाणं टाळता? जाणून घ्या योग्य पद्धत, मिळतील अनेक फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 10:29 IST2024-11-29T10:09:40+5:302024-11-29T10:29:26+5:30
काकडीने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. हिवाळ्यात तहान कमी लागते आणि यामुळे शरीरात डिहायड्रेट होऊ शकते.

थंडीमुळे काकडी खाणं टाळता? जाणून घ्या योग्य पद्धत, मिळतील अनेक फायदे!
काकडी भरपूर लोक रोज आवडीने खातात. पोट थंड ठेवण्यासाठी, शरीरात पाण्याची लेव्हल कायम ठेवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी काकडीचं सेवन केलं जातं. मात्र, भरपूर लोक हिवाळ्यात काकडी खाणं सोडतात. कारण काकडी थंड असते. अशात त्यांना सर्दी होण्याची भिती असते. पण हा समज चुकीचा आहे.
हिवाळ्यात शरीराची पचनक्रिया कमजोर होत असते. यामुळे काकडी खाल्ल्याने पचनास समस्या होऊ शकते. तसेच गॅस, अपचनाची समस्याही होऊ शकते. मात्र, या समस्यांपासून बचाव केला जाऊ शकतो. यासाठी काकडी खाण्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला माहीत असली पाहिजे.
हिवाळ्यात काकडी खाण्याचे फायदे
काकडीने शरीरात डिहायड्रेशन होत नाही. हिवाळ्यात तहान कमी लागते आणि यामुळे शरीरात डिहायड्रेट होऊ शकते. तोंड कोरडं पडणे, त्वचा ड्राय होणे, ओठ उलणे याची मुख्य लक्षणं आहेत. एक्सपर्ट सांगतात की, काकडीमध्ये ९० टक्के पाणी असतं. अशात काकडीने डिहायड्रेशन कमी करण्यास मदत मिळते.
बद्धकोष्ठता होईल दूर
पाणी कमी झाल्याने बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. काकडीमध्ये पाण्यासोबतच फायबरही भरपूर प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टींमुळे पोट साफ होण्यास मदत मिळते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासून बचाव होतो.
वजन कमी होईल
हिवाळ्यात भूक वाढते. त्यामुळे खाणं-पिणंही जास्त होतं. अशात वजन कमी करणं अवघड होतं. मात्र, काकडीच्या सलादचा डाएटमध्ये समावेश केल्यास कॅलरी इनटेक कमी केलं जाऊ शकतं. तसेच फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी लागते.
ब्लड शुगर कंट्रोल
एक्सपर्ट अनेक रिसर्चचा हवाला देऊन सांगतात की, काकडीच्या सेवनाने डायबिटीसचा धोका कमी केला जाऊ शकतो. याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. यासाठी काकडी सालीसोबत खाणं अधिक फायदेशीर ठरतं.
काकडी खाण्याची योग्य पद्धत
काकडी थंड असते आणि पचन होण्यास थोडा वेळ लागतो. त्यामुळे काकडी रात्री खाणं टाळलं पाहिजे. जेव्हाही काकडी किंवा काकडीचा सलाद खाल तेव्हा एक बदल करा. काकडीवर काळी मिरी पावडर, जिरेपूड, काळं मीठ असे मसाले टाका. यामुळे काकडी लवकर पचेल.