(Image credit- bustle)

आजकाल सगळेच लोकं आपापल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर वेबसीरीज बघत असतात. कारण इतर कोणत्याही माध्यामापेक्षा किंवा कोणत्याही मंनोरजनापेक्षा वेबसीरीज पाच्या साधनाहण्यात युवावर्गाला जास्त रस असतो. पण  जर तुम्ही एमोझॉनवर किंवा  नेटफ्लिक्सवर जास्तीत जास्त  वेळ वाया घालवून वेबसीरीज बघत असाल तर तुम्हाला हीच गोष्ट महागात पडू शकते. 

Image result for using mobile at night

अनेकदा लोक वेबसीरीज बघत असताना रात्री उशीरापर्यंत वेळ घालवतात. त्यामुळे  झोप पूर्ण होत नाही. शरीराच्या वाढीसाठी ७ ते ८ तास झोप घेणं हे महत्वाचं असतं. झोप पूर्ण न झाल्यास  मुड फ्रेश राहत नाही. पचनासंबंधी वेगवेगळे त्रास होत जातात. वेबसिरीज पाहाणारा वर्ग आणि त्याची परीणामकता यांवर आधारीत रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार ऑनलाइन वीडियो सर्विसमुळे भारतीयांना झोपेशी संबंधीत समस्या उद्भवत आहे. तुम्हाला या गंभीर आजारांपासून दूर राहायचं असल्यास तुम्ही रात्री उशीरापर्यंत वेबसिरिज पाहणे टाळा.  अन्यथा तुम्ही सुद्धा गंभीर आजारांचे शिकार होऊ शकता. 

Related image(image credit- seattletimes.com)

या रिसर्चनुसार वेबसीरीज पाहत असलेल्या लोकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  त्यातही सर्वाधिक लोक रात्री वेबसीरीज पाहतात. वेबसीरीज पाहण्यासाठी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर केला जातो. त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा  लागत आहे.  डोळे खराब होणे, झोप न लागणे अशा आरोग्यासंबंधी तक्रारी उद्भवतात वेबसीरीज  जास्तवेळ बसून बघत असल्यामुळे अपुरी झोप होते त्यामुळे  वेगवेगळ्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळत आहे. (हे पण वाचा-काय आहे त्वचेवर होणारी फॉलिक्युलिटिस समस्या? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे...)

Image result for watching movie on laptop

या रिसर्चमध्ये असं सुध्दा म्हटले आहे की रात्री उशीरापर्यंत वेबसिरीज पाहत असेलेल्या लोकांमध्ये ऑनलाईन फुड मागवण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे.  त्यामुळे शारीरिक हालचाली होत नाहीत. म्हणूनच दिवसेंदिवस लठ्ठपणाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. काहीही न करता निष्क्रीय बसून राहणारे सुद्धा अनेक लोक आहेत. ही रिसर्च प्रामुख्याने डाएट आणि फिटनेसच्या पध्दती समजण्यासाठी करण्यात आला होता. यानुसार जर तुम्हाला वेबसिरीज पाहण्याची  आवड असेल तर तुम्ही  ते कोणत्या वेळेत पाहता  हे सुद्धा महत्वाचं असतं.

Web Title: Research says Indians are in sleep problems due to video streaming services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.