...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 06:48 PM2018-12-10T18:48:36+5:302018-12-10T18:49:38+5:30

सध्या आपल्या मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये बुफे लंच किंवा डिनरची क्रेझ वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या पंक्तीची जागा आता अगदी सहजपणे बुफेने घेतली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

Reasons why sitting down for a meal is good for you | ...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर!

...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर!

Next

सध्या आपल्या मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये बुफे लंच किंवा डिनरची क्रेझ वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या पंक्तीची जागा आता अगदी सहजपणे बुफेने घेतली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. अजूनही वयोवृद्ध लोकांकडून वाढत्या बुफेच्या क्रेझबाबत टोमणे ऐकायला मिळतात. त्यांचा नेहमी एकच आग्रह तो म्हणजे, बुफे म्हणजे उगाच पाश्चात्य संस्कृतीचा आणलेला आव आहे. कशाला हवीत ही थेरं? पंगतीतलं जेवणं म्हणजे अन्नपुर्णेनं तथास्तु म्हटल्यासारखं.... वाढप्यांनी आग्रहाने ताटात वाढावं आणि जेवणाऱ्याने तेवढ्याच आत्मियतेने ते पोटात ढकलून तृप्त व्हावं! असं आहे का तुमच्या बुफेत....? असो, पण अनेकदा या बुफेमध्ये उभं राहून ताट हातात धरून जेवावं लागतं किंवा मग अनेक ठिकाणी टेबल्सची व्यवस्था करण्यात आलेली असते. पण तुम्हाला माहीत आहे का? बुफे किंवा हॉटेलमध्ये टेबलवर बसून जेवण्यापेक्षा जमिनीवर बसून जेवण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. अजूनही उभं राहून न जेवता जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीवर बसून जेवण्याचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणं हा पद्मासनाचाच  एक प्रकार असून या आसनाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. जाणून घेऊया  जमिनीवर बसून जेवण्याचे आरोग्यदायी फायदे...

- आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा आपण जंक फूडचा आधार घेतो. त्यामुळे पोटाच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. जमिनीवर बसून जेवल्याने पचन क्रिया नीट होते. जेवताना जेव्हा आपण घास खाण्यासाठी खाली वाकतो त्यावेळी पोटातील मांसपेशींची हालचाल होते आणि त्या सक्रिय होतात. त्यामुळे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अॅसिडचे प्रमाण वाढते आणि अन्न पचवण्यासाठी मदत होते. 

- जमिनीवर बसून जेवल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवताना जेव्हा आपण मांडी घालून खाली बसतो. त्यावेळी आपला मेंदू शांत होतो. त्यामुळे जेवणावर लक्ष केंद्रीत होणं सोपं जातं. बसून जेवल्यामुळे पोटाला आणि मेंदूला पोट भरल्यानंतर समजणं शक्य होतं. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून वाचणं शक्य होतं. 

- जेव्हा मांडी घालून जमिनीवर बसतो. त्यावेळी पाठीचा मणका आणि पोटाच्या आजूबाजूचे स्नायू ताणले जातात. स्नायूंची हालचाल झाल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 

- जमिनीवर बसून जेवल्याने आपलं ध्यान फक्त जेवणावरच राहतं. त्यामुळे मन शांत राहतं आणि शरीराला योग्य पोषक तत्व स्वीकारण्यास मदत मिळते. 

- जमिनीवर बसून जेवल्याने तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. कारण मांडी घालून जेवल्याने पाठीचा मणका आणि पाठीच्या इतर समस्या होत नाहीत.

Web Title: Reasons why sitting down for a meal is good for you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.