शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूमुळे गर्भवतीचा मृत्यू

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

-महिन्याभरात सहा जणांचा मृत्यू : मेडिकलमध्ये आठवड्याभरात चार जणांचा मृत्यू (स्वाईन फ्लूचा फोटो वापरावा)नागपूर : पाच वर्षांपूर्वी दहशत माजवणाऱ्या स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा धूडगूस घातला आहे. या महिन्यात आतापर्यंत १२ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पुन्हा एका स्वाईन फ्लू रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ...


-महिन्याभरात सहा जणांचा मृत्यू : मेडिकलमध्ये आठवड्याभरात चार जणांचा मृत्यू
(स्वाईन फ्लूचा फोटो वापरावा)
नागपूर : पाच वर्षांपूर्वी दहशत माजवणाऱ्या स्वाईन फ्लूने पुन्हा एकदा धूडगूस घातला आहे. या महिन्यात आतापर्यंत १२ रुग्ण पॉझिटीव्ह आले असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पुन्हा एका स्वाईन फ्लू रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे या रोगाचे रुग्ण वाढत असताना दुसरीकडे स्वाईन फ्लू वॉर्ड स्वतंत्र असतानाही येथे औषध वैद्यकशास्त्र विभागाचे (मेडिसीन) रुग्ण ठेवले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाडी येथील प्रिया पंकज हुमने (२२) असे मृताचे नाव आहे. प्रिया ही नऊ महिन्याची गर्भवती होती.
मिळालेल्या माहितीनुसार प्रिया हुमने हिच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मंगळवारी तिच्या घशाचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तिला स्वाईन फ्लू असल्याचा अहवाल मिळताच प्रियाला वॉर्ड क्र. २५ मध्ये स्थानांतरीत करण्यात आले. बुधवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गर्भातील नऊ महिन्याच्या शिशूलाही डॉक्टरांना वाचविता आले नाही. मेडिकलमध्ये आतापर्यंत आठ जण पॉझिटीव्ह आले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. इतर दोन रुग्णांचा मृत्यू खासगी इस्पितळात झाला.
-स्वाईन फ्लूच्या वॉर्डात मेडिसीनचे रुग्ण
२००९ मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत वाढ झाल्याने वॉर्ड क्र. २५ला स्वाईन फ्लू वॉर्ड करण्यात आले. २०१२ नंतर या रोगाच्या रुग्ण संख्या घटली. यामुळे मेडिसीन विभागाच्या महिला रुग्णांना या वॉर्डात ठेवण्यात येऊ लागले. परंतु आता पुन्हा स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढल्याने मेडिसीनचे रुग्ण अडचणीत आले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिसीन विभागाला हा वॉर्ड रिकामा करण्याचे आदेश दिले. परंतु रुग्णांना ठेवावे कुठे हा प्रश्न विभागासमोर ठाकला आहे. दुसरीकडे मेडिसीनच्या रुग्णांसोबत स्वाईन फ्लूचे रुग्ण ठेवण्यात येत असल्याने रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
-व्हेंटिलेटरही अपुरे
रुग्ण अत्यवस्थ झाला की श्वासोच्छवास घेण्यात अडचण होते. अशावेळी त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येतो व हे काम व्हेंटिलेटर हे अत्याधुनिक यंत्र करते. परंतु मेडिकलमध्ये केवळ १७ व्हेंटिलेटर सुरू असल्याने रुग्ण अडचणीत येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ३१ व्हेंटिलेटर मधून तीन व्हेंटिलेटर पूर्णत: निकामी आहेत. उर्वरित २८ मधून तब्बल ११ बंद आहेत.