लढ्याला यश! पिंपरी-चिंचवडमधील १०५ वर्षीय आजींनी कोरोनाला हरवलं, अन् झाल्या ठणठणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 16:22 IST2020-12-20T16:09:48+5:302020-12-20T16:22:36+5:30
CoronaVirus News and Latest Updates : पिंपरी-चिंचवडमधील १०५ वर्ष आजींनी कोरोनावर मात केली असून आता या आजी पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.

लढ्याला यश! पिंपरी-चिंचवडमधील १०५ वर्षीय आजींनी कोरोनाला हरवलं, अन् झाल्या ठणठणीत
कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कहर केला आहे. या कालावधीत अनेक गंभीर प्रसंगाचा सामना करावा लागला. कोरोना व्हायरसने जगभरातील लाखो लोकांचा जीव घेतला. यात आधी गंभीर आजार असलेल्या तसंच जास्त वय असलेल्या लोकांचा समावेश होता. अशा स्थितीत खूप कमी लोक असे होते. ज्यांनी यशस्वीरित्या कोरोनाचा सामना केला आणि ठणठणीत बरे झाले. अशीच सकारात्मक माहिती समोर येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १०५ वर्ष आजींनी कोरोनावर मात केली असून आता या आजी पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत.
१०५ वर्षीय आजींचे नाव शांताबाई गणपत हुलावळे असून त्यांच्या कुटुंबातील चौघा जणांना कोरोनाची लागण झाली होती. लक्षणं दिसत असल्याने आजींचीही कोरोनाची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना वाकडमधील एका रुग्णालयात भरती करण्यात आलं होत. या रुग्णालयात आजींवर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आजींना रेमडिसिव्हरची इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर काही दिवसातच आजींची प्रकृती सुधारू लागली. आजींच्या शरीरानं उपचाराला प्रतिसाद दिला.
चिंताजनक! कोरोनाच्या नव्या रूपानं केला कहर; आणखी एका देशात ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द होणार
१५ दिवसांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर आजाींना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांनी सुद्धा आजींचे कौतुक करत अभिनंदन केले. सध्या आजींची प्रकृती उत्तम असून त्या सगळ्यांशी गप्पा मारत आहेत. सोशल मीडियावर या आजींचे खूप कौतुक होत आहे.
शांताबाई यांचे नातू शायमराव हुलावळे यांनी सांगितले की,'' आजींची स्मरणशक्ती चांगली असून आजी रोज चांगला आहार घेतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळेच आजी कोरोनावर मात करू शकल्या. '' आजींना कुटुंबासोबत गप्पा गोष्टी करायला खूप आवडतं. कोरोनाच्या संक्रमणादरम्यान जे काही झालं. तो अनुभव आजी सगळ्यांना सांगतात. चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...