चिंताजनक! कोरोनाच्या नव्या रूपानं केला कहर; आणखी एका देशात ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 03:31 PM2020-12-20T15:31:55+5:302020-12-20T16:20:55+5:30

CoronaVirus News & Upadates : कोरोनाचा हा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देशातील ख्रिसमस बबल रद्द करण्याची घोषणा केली आहे.

New coronavirus strain spreads fast in many areas of britain cancels christmas bubble | चिंताजनक! कोरोनाच्या नव्या रूपानं केला कहर; आणखी एका देशात ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द होणार

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या रूपानं केला कहर; आणखी एका देशात ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द होणार

Next

कोरोना व्हायरसने गेल्या वर्षभरापासून कहर केला आहे. आतापर्यंत कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना व्हायरसचा प्रसार अजूनही आटोक्यात आलेला नाही. आता कोरोनाचा हा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी देशातील ख्रिसमस बबल रद्द करण्याची घोषणा केली आहे. युरोपातील जर्मनीनेही यापूर्वी ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या कालखंडात देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. ब्रिटनसह इतर देशात सण उत्सवांच्या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

ब्रिटनचे आरोग्य सचिन मॅट हँकॉक यांनी  सांगितले की, ''देशातील ईशान्य भागात कोरानाच्या नव्या प्रकाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या भागातील १००० पेक्षा जास्त नागरिकांना याची लागण झाली आहे. संपूर्ण ब्रिटनमध्येही या महिनाभरात कोरोना व्हायरसचे रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन यांनी राजधानी लंडन आणि ईशान्य भागातील नागरिकांना ३० डिसेंबरपर्यंत घरात राहण्याचे आदेश दिले आहेत.'' 

चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...

देशातील आरोग्य विभागाने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला (WHO) याबाबत माहिती दिली आहे. या नव्या ‘कोरोना व्हायरस स्ट्रेन’ चा देशात वेगाने प्रसार होत आहे. या आजारावर कोरोनाचे औषध लागू होईल का, याबाबत अजून कोणतीही माहिती देणे शक्य नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

पोटाच्या विकारांसह थकवा घालवण्यासाठी गुणकारी ठरतं सैंधव मीठ; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

ख्रिसमस कार्यक्रम रद्द

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढल्याने पंतप्रधान जॉन्सन यांनी देशातील ख्रिसमसचे कार्यक्रम रद्द केले आहे. याआधी ख्रिसमसच्या कार्यक्रमांसाठी नियमांमध्ये सूट देण्याचा निर्णय सरकानं घेतला होता. राजधानी लंडनसह अनेक भागात तिसऱ्या श्रेणीचे निर्बंध लादण्यात आले आहेत. या भागात गरज पडली तर लवकरच चौथ्या टप्प्यातील निर्बंध लादण्यात येणार आहेत.

दरम्यान देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या २४ तासांत देशभरामध्ये २५ हजार १५३ नवे रुग्ण सापडले असून, त्यामुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ एवढी झाली आहे. एक कोटी कोरोनाबाधित रुग्ण असलेला भारत हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश ठरला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होत असून, सध्या देशात केवळ ३ लाख ८ हजार ७५१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये २५ हजार १५३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही १ कोटी चार हजार ५९९ वर पोहोचली आहे. एकूण रुग्णांपैकी ९५ लाख ५० हजार ७१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ लाख ४५ हजार १३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३ लाख आठ हजार ७५१ एवढी आहे. 

Web Title: New coronavirus strain spreads fast in many areas of britain cancels christmas bubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.