शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रोज १० हजार पावलांचं गणित ऐकलंच असेल; पण चालण्याचा वेग किती हवा माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 10:54 IST

Walking Speed : रोज पायी चालल्याने तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव होईल आणि एकंदर आरोग्याला फायदाही होईल.

Walking Speed : गेल्या काही वर्षात लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. हे आता केवळ म्हातारपणातील आजार राहिलेले नसून कमी वयातही होऊ लागले आहेत. त्यामुळे आजारांसंबंधी वेगवेगळे रिसर्च सतत समोर येत असतात. गेल्या काही वर्षातील रिसर्चमधून समोर आलं आहे की, रोज पायी चालल्याने तुमचा अनेक गंभीर आजारांपासून बचाव होईल आणि एकंदर आरोग्याला फायदाही होईल. पायी चालल्याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहील, हृदयारोगांचा धोका टळेल आणि शरीर फीट राहील.

हेच कारण आहे की, अलिकडे जास्तीत जास्त लोक फिटनेसबाबत जागरूक झालेले दिसतात आणि पायी चालण्याला प्राधान्य देतात. सामान्यपणे रोज किमान 10 हजार पावलं चालण्याचा एक ट्रेंड आहे. ज्याचे वेगवेगळे फायदे शरीराला मिळतात. मात्र, फिजिकल अॅक्टिविटीच्या इतरही काही रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, कमी पावलं चालूनही तुम्ही फीट आणि हेल्दी राहू शकता.

रोज किती पावलं चालावीत?

Vanderbilt University Medical Center in Nashville च्या 2022 मधील एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, रोज 8,200 पावलं पायी चालूनही तुम्ही लठ्ठपणा, झोप येण्याची समस्या, गॅसची समस्या, डायबिटीस, तणाव दूर करू शकता. 

Sports Medicine जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, जेवणानंतर 15 मिनिटे पायी चालल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि डायबिटीसचा धोका कमी होतो. सामान्यपणे चालण्याचे अनेक फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत असतं. पण चालण्याची पद्धत क्वचितच कुणाला माहीत असेल. पायी चालण्याचा जास्त आणि चांगला फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुमची चालण्याची पद्धतही योग्य असेल.

किती असावा चालण्याचा वेग?

Sports Medicine जर्नलमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, डायबिटीससारख्या आजाराचा धोका टाळण्यासाठी पुरूषांनी साधारपणे 1 मिनिटात 87 पावलं आणि महिलांनी 1 मिनिटात 100 पावलं चाललं पाहिजे.

काय चुका टाळाव्या?

तसेच पायी चालताना काही चुका टाळल्या पाहीजे जसे की, पायी चालताना खाली बघू नये. याने मानदुखीसारखी समस्या होऊ शकते. चालताना बॉडीचं पोश्चर सरळ असलं पाहिजे. त्यासोबतच चालायला सुरूवात करण्याआधी थोडा वार्मअप करा. याने स्नायू मोकळे होण्यास मदत मिळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला शरीरानुसार जेवढं झेपतं तेवढंच चाला. जबरदस्तीने जास्त पावलं चालू नका. टप्प्या टप्प्याने पावलं आणि वेग वाढवा. चालताना काही दुखत असेल तर थोडावेळ आराम करा. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य