Obesity and diabetes major risk factor for non alcoholic fatty liver disease | सावधान! दारू न पिणाऱ्यांचंही लिवर होऊ शकतं खराब, जाणून घ्या कारण...

सावधान! दारू न पिणाऱ्यांचंही लिवर होऊ शकतं खराब, जाणून घ्या कारण...

Non alcoholic fatty liver disease : ज्या लोकांचं वजन अधिक आहे, जे लोक लठ्ठपणाने (Obesity) शिकार आहेत आणि असे लोक जे डायबिटीसचे (Diabetes) रग्ण आहेत त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीज होण्याचा धोका सर्वात जास्त राहतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना सांगितले की भारतातील साधारण ९ टक्के ते ३२ टक्के लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीज (NAFLD - Non alcoholic fatty liver disease) आहे. अनेक लोकांना वाटतं की, लिवरशी संबंधित आजार किंवा लिवर खराब होण्याची समस्या केवळ दारू पिणाऱ्या लोकांना होतात. पण असं नाहीये. अलिकडे अल्कोहोल न पिणाऱ्या लोकांनाही फॅटी लिवर डिजीज वेगाने होत आहे. 

डायबिटीसच्या रूग्णांना NAFLD होण्याचा धोका ८० टक्के अधिक

वैज्ञानिकांना आढळून आलं की, ज्या लोकांना टाइप-२ डायबिटीस आहे त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीज (Non alcoholic fatty liver disease ) होण्याचा धोका ४० ते ८० टक्के अधिक असतो. तेच ज्या लोकांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांना या आजाराचा धोका ३० ते ९० टक्के अधिक असतो. याबाबत करण्यात आलेल्या अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की, ज्या लोकांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीज असतो त्या रूग्णांना कार्डियोवस्क्युलर डिजीज म्हणजे हृदय रोगाचा धोकाही अधिक असतो. (हे पण वाचा : High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशरच्या २ वॉर्निंग साइन; डोळे आणि चेहऱ्यावरील निशाणाकडे करू नका दुर्लक्ष!)

नेमकं काय होतं?

लठ्ठपणाची समस्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीजशी संबंधित आहे कारण शरीरातील अतिरिक्त फॅटमुळे इन्सुलिन रेजिस्टेंस होतो आणि इन्फ्लेमेशन होऊ लागतो. इन्सुलिन रेजिस्टेंसमुळे पॅनक्रियाजला  अधिक इन्सुलिनचं उत्पादन करावं लागतं. जेणेकरून शरीरातील ब्लड ग्लूकोजचं प्रमाण सामान्य रहावं. आणि यामुळे डायबिटीस विकसित होण्याचा धोका वाढतो. (हे पण वाचा : पाठ आणि कंबरदुखीचे कारण ठरू शकतात रोजच्या चुकीच्या सवयी; पाठीच्या कण्याचं होतय नुकसान)

लिवर कॅन्सर आणि सिरोसिसचाही धोका

केंद्रीय आऱोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीजसंबंधी काही ऑपरेशनल गाइडलाईन्स लॉन्च करताना सांगितले की, 'NAFLD हा एक असा आजार आहे  ज्यात फॅटी लिवरशी संबंधित सेकंडरी कारणांशिवायही लिवरमध्ये असामान्य रूपाने फॅट जमा होऊ लागतं. यामुळे इतरही काही आजार होऊ शकतात. जसे की, लिवर सिसोसिस, लिवर कॅन्सर आणि नॉन-अल्कोहोलिक स्टीटो-हेपेटायटिस. भारतात लिवरशी संबंधित आजारांचं मुख्य कारण नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीज हा आजार ठरत आहे'.

आपली लाइफस्टाईल आणि व्यवहार यात बदल करून आणि आजार वेळीच डायग्नोजकरून नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिजीज आजार वेळीच मॅनेज केला जाऊ शकतो. यासाठी डॉक्टरांशी वेळीच संपर्क साधणं महत्वाचं आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Obesity and diabetes major risk factor for non alcoholic fatty liver disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.