शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

'या' कारणामुळे मुलं शाळेत न जाण्यासाठी कारणं शोधत असतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 14:53 IST

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकजण तणावाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अशातच तणाव ही अशी समस्या आहे, ज्यामुळे फक्त मोठी माणसचं नाहीत तर लहान मुलंही त्रस्त आहेत.

(Image credit : The Conversation)

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे प्रत्येकजण तणावाच्या समस्येने ग्रासलेले आहेत. अशातच तणाव ही अशी समस्या आहे, ज्यामुळे फक्त मोठी माणसचं नाहीत तर लहान मुलंही त्रस्त आहेत. आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की, लहन मुलांना अजिबात ताण नसतो, सगळ्या गोष्टींच्या चिंता फक्त आपल्यालाच असतात. परंतु, असा विचार करणं अगदी चुकीचं आहे. प्रत्येक व्यक्तीला वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. एका नव्या संशोधनातून, जर तुमचं मूल शाळेन न जाण्यासाठी नवनवीन कारणं देत असेल आणि त्याला फक्त घरात बसून रहावसं वाटत असेल तर तुमचं मुल डिप्रेशनमध्ये असण्याची शक्यता आहे. 

यूनिवर्सिटी ऑफ एक्सर्टनल मेडिकल स्कूल द्वारे करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जर तुमच्या मुलाची शाळेतील हजेरी फार कमी असेल तर त्याचं कारण डिप्रेशन असू शकतं.  CAMAमध्ये प्रकाशित संशोधनातून आपल्याला हे समजणं शक्य होतं की, मुलांमध्ये वाढती तणावाची लक्षणं आणि शाळेतील त्यांची उपस्थिती यांचा परस्परांशी असलेला संबंध नेमका काय असतो. 

या संशोधनासाठी, शाळेतील हजेरीला 4 भागांमध्ये वाटलं होतं. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर त्यांनी अशी कारणं चिन्हांकित केली ज्यामुळे मुलं शाळेला दांडी मारतात. ती चार कारणं म्हणजे, कधी-कधी शाळेत न जाणं, आजारी असल्यामुळे सुट्टी घेणं, कारणाशिवाय सुट्टी घेणं, शाळेत जाण्यासाठी स्पष्ट नकार देणं. या सर्व कारणांचा अभ्यास केल्यानंतर संशोधकांना समजलं की, कोणत्याही कारणाशिवाय जी सुट्टी घेतली जाते. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण तणाव आहे. 

संशोधनाचे मुख्य संशोधक कॅटी फिनिंग यांनी सांगितल्यानुसार, खरं तर एवढ्या लहान मुलांमध्ये डिप्रेशनची लक्षणं दिसणं ही अत्यंत चिताजनक गोष्ट आहे. त्यांनी या गोष्टींवरही भर दिला की, तणाव मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये अडथळा बनतात. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याला सुरुवातीलाच या समस्येबाबत समजलं असून आपल्याला लवकरात लवकर ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. ज्यामुळे आपण लहन मुलांना डिप्रेशनसारख्या समस्येपासून दूर ठेवू शकतो. मुलांमधील या लक्षणांना समजणं अनेकदा अवघड असतं. यासाठीच संशोधनाचे तमसिन फोर्ड यांनी सांगितल्यानुसार, अनेकदा मुलं पालकांकडे तक्रार करतात की, त्यांचं पोट दुखतयं किंवा डोकं दुखतयं. अशा परिस्थितीमध्ये शाळेतील स्टाफनेही याकडे दुर्लक्षं करू नये. कारण या लक्षणांचं कारण तणाव आहे. 

आपल्याला हेदेखील समजून घेणं आवश्यक आहे की, सामान्य तणाव हा कोणताही आजार नाही. थोडा तणाव तर कोणालाही असतो. परंतु, जर हा तणाव आपल्या मुलांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम करत असेल आणि त्यांची काम करण्याची क्षमता प्रभावित होत असेल तर हे चिंताजनक आहे. 

तसं पाहायला गेलं तर तणावावर उपचार करणं शक्य आहे. परंतु, तणावाला नकार देणं हा यावरील उपाय नाही. यामुळे समस्या आणखी वाढू शकतात. डिप्रेशनसारख्य मानसिक समस्येबाबत अनेक समाजिक संस्था जनजागृती करत असतात. तसेच याबाबत जास्तीतजास्त संशोधनं करण्यात यावी यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. 

टॅग्स :ResearchसंशोधनParenting Tipsपालकत्वHealth Tipsहेल्थ टिप्स