वजन वाढता वाढत नाहीये? मग 'हे' खा, बघा वजन कसं झटपट वाढेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:00 PM2021-07-18T12:00:04+5:302021-07-18T12:05:01+5:30

ज्या लोकांचे वजन प्रमाणापेक्षाही कमी आहे, अशा लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्हीही कमी वजनामुळे त्रस्त असाल तर आपण काही टिप्स फॉलो करून वजन वाढू शकता.

No weight gain? so eat 'these' foods, see how to gain weight instantly ... | वजन वाढता वाढत नाहीये? मग 'हे' खा, बघा वजन कसं झटपट वाढेल...

वजन वाढता वाढत नाहीये? मग 'हे' खा, बघा वजन कसं झटपट वाढेल...

Next

फक्त वजन घटवणच नाहीत तर वजन वाढवणंही मोठे आव्हानच असते. ज्या लोकांचे वजन प्रमाणापेक्षाही कमी आहे, अशा लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. जर तुम्हीही कमी वजनामुळे त्रस्त असाल तर आपण काही टिप्स फॉलो करून वजन वाढू शकता. 

हरभरा : काळा हरभरा भिजवून रोज खाल्ल्याने वजन वाढतं आणि शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय रात्री झोपताना एका ग्लास दुधात अश्वगंधा पावडर मिक्स करून प्या.

केळी आणि दूध : वजन वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दूध आणि केळी. केळीमध्ये भरपूर कॅलरी असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, परंतु वजन वाढण्यासही ते उपयोगी ठरते. आपण इच्छित असल्यास, दूध आणि केळी शेक देखील पिऊ शकता.

बटाटे : बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि जटिल साखर असते. बटाटे खाण्यास चवदार आणि वजनही वाढवतात. आपण आपल्या आहारात बटाट्यांचा समावेश केला पाहीजे. ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

खजूर आणि दूध : एका ग्लास उकळलेल्या दुधामध्ये खजूर मिक्स करा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते आणि शरीराची ताकद देखील वाढते. जर आपल्याकडे खजूर नसेल तर आपण खारीक देखील घेऊ शकतो.

मनुका : रोज मूठभर मनुका खाल्ल्याने वजन वाढतं, तसेच शरीरातील रक्ताचा अभावही दूर होतो. जर आपण भिजवलेले मनुके खाल्ले तर ते आधिक फायदेशीर ठरेल.

Web Title: No weight gain? so eat 'these' foods, see how to gain weight instantly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.