आता फुंकर मारल्यावर कोरोनाची चाचणी होणार; नवी चाचणी 90 % अचूक असल्याचा तज्ज्ञांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 01:43 PM2020-10-22T13:43:03+5:302020-10-22T13:44:02+5:30

CoronaVirus News & Latest Updates: सिंगापूरमध्ये हे टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याद्वारे कोरोना व्हायरसची चाचणी १ मिनिटात होऊ शकते.

New cheapest coronavirus test results within one minute by breathe testing technique in singapore | आता फुंकर मारल्यावर कोरोनाची चाचणी होणार; नवी चाचणी 90 % अचूक असल्याचा तज्ज्ञांचा दावा 

आता फुंकर मारल्यावर कोरोनाची चाचणी होणार; नवी चाचणी 90 % अचूक असल्याचा तज्ज्ञांचा दावा 

Next

कोरोना व्हायरसच्या युद्धात सुरूवातीपासून नवनवीन माहिती समोर येत आहे. कोरोनाची चाचणी लवकरात लवकर करता यावी तसचं वेळ आणि पैसे या दोन्हींची बचत करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील शास्त्रज्ञांचे संशोधन  सुरू होते. आता सिंगापूरमधील शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसच्या टेस्टबाबत एक नवीन तंत्र विकसित केलं आहे. याद्वारे फुंकर मारून कोरोना व्हायरसची लागण झाली आहे की नाही, याबाबत माहिती मिळवता येईल.

या तंत्राच्या साहाय्याने श्वासांमध्ये असलेल्या ऑर्गेनिक कंपाऊंडद्वारे कोरोना व्हायरस आहे की नाही याबाबत माहिती घेतली जाईल. विशेष म्हणजे या चाचणीसाठी १ मिनिटापेक्षा कमी कालावधी लागणार आहे. या चाचणीचे परिणाम  हे ९० टक्के अचूक असल्याचा दावा करण्यात आला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सिंगापूरमध्ये हे टेस्ट किट तयार करण्यात आलं आहे. ज्याद्वारे कोरोना व्हायरसची चाचणी कमी वेळात करता येऊ शकते. या चाचणीत फक्त फुंकर मारल्यानंतर चाचणी निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह हे पाहण्यास मदत होईल.

सांकेतिक तस्वीर

ही चाचणी कशी प्रभावी ठरणार?

सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याद्वारे कोरोना व्हायरसची चाचणी १ मिनिटात होऊ शकते. व्यक्तीच्या श्वासांमधील ऑर्गेनक कंपाऊडद्वारे व्हायरसच्या अस्तित्त्वाबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. या तंत्राच्या आधारे चाचणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे की नाही हे पाहण्यासाठी संदिग्ध ब्रीद नमुन्यांवर फुंकर मारावी लागणार आहे. 'मास्क' च्या किंमतीवर आता सरकारचे नियंत्रण; काळाबाजार रोखणार, वाचा नव्या किमती

नॅशनल युनिव्हर्सिटीने दावा केला आहे की, या  टेक्निकचा वापर करून १८० रुग्णांवर परिक्षण केलं जाणार आहे.  स्टार्टअप सीईओ डू फँग यांनी सांगितले की,'' ब्रीथ सॅम्पलरमध्ये असलेले माऊथपीस डिस्पोजेबल असतील. त्यामुळे फुंकर मारल्यानंतर पुन्हा हवा आत जाऊ शकणार नाही. कारण हे मशिन वन वे वाल्व असून त्यात सलायवा ट्रॅप  लावली आहे.''  स्टार्टअप ब्रीथॉनिक्सच्या सीईओ डॉ. जिया झूनान यांनी दिलेल्या माहितीनुसार ,''वेगवेगळे आजार झाल्यानंतर श्वासांमध्ये बदल होतात. त्यामुळे तोंडातून सोडलेल्या वाष्पशील ऑर्गेनिक कम्पाऊंड्सद्वारे व्हायरसच्या अस्तित्वाबाबत माहिती मिळवता येऊ शकते.  कोरोना व्हायररसच्या चाचणीसाठी हे चांगले तंत्र आहे.'' स्वदेशी लसीची शेवटची चाचणी पुढच्या महिन्यात सुरू होणार, फेब्रुवारीत Covaxin येणार?

माऊथवॉशमुळे कोरोना व्हायरस होऊ शकतो निष्क्रिय?

माऊथवॉशच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होत असल्याचा दावा आता रिसर्चमधून करण्यात आला आहे. काही माऊथवॉश आणि तोंडाच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणाऱ्या अँटीसेफ्टीक औषधांच्या वापरामुळे कोरोना व्हायरस निष्क्रिय होऊ शकतो अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे. वैद्यकीय नियतकालिक 'मेडिकल वायरोलॉजी' या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. काही माऊथवॉश आणि अँटीसेफ्टीक औषधं यांच्या वापरामुळे तोंडात असणारे व्हायरसचे प्रमाण कमी होऊ शकतं.

अमेरिकेतील पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी कोरोना व्हायरस निष्क्रिय करण्याच्या क्षमतेबाबत जाणून घेण्यासाठी काही माऊथवॉश आणि नेजोफेरिंजिअल रिन्जची चाचणी केली. यामध्ये कोरोना निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावणाऱ्या व्हायरसचे प्रमाण कमी करण्याची क्षमता या उत्पादनांमध्ये असू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर क्रेग मेयर्स यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Web Title: New cheapest coronavirus test results within one minute by breathe testing technique in singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.