Bharat biotech corovirus vaccine covaxin phase-3 trial to begin next month | स्वदेशी लसीची शेवटची चाचणी पुढच्या महिन्यात सुरू होणार, फेब्रुवारीत Covaxin येणार?

स्वदेशी लसीची शेवटची चाचणी पुढच्या महिन्यात सुरू होणार, फेब्रुवारीत Covaxin येणार?

स्वदेशी कोरोना लसीची शेवटच्या टप्प्यातील चाचणी पुढच्या महिन्यात सुरू होऊ शकते. भारत बायोटेकला ड्रग रेग्यूलेटरकडून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. DCGI च्या तज्ज्ञांची मंगळवारी एक बैठक झाली. या बैठकीत लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी देण्यात आली. DCGI ने प्रोटोकॉल्सबाबत संशोधन केले होते. भारतात या लसीच्या चाचणीसाठी २५ हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.स्वयंसेवकांना  २८ दिवसांच्या अंतरावर लस दिली जाण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या लसीच्या चाचण्यांमध्ये आशेचा किरण दिसला आहे. कोवॅक्सिन  ही पहिली स्वदेशी कोरोना लस आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या तज्ज्ञांनी मिळून ही लस तयार केली आहे. 

या लसीची कमिटी मीटिंग  ५ ऑक्टोबरला झाली होती. त्यात कंपनीने तिसऱ्या टप्प्यातील प्रोटोकॉल्स पुन्हा जमा करण्यास सांगितले होते. कमिटीने दिलेल्या माहितीनुसा तिसऱ्या टप्प्प्यातील रचना आणि मांडणी ही समाधानकारक होती. सुरूवातीला  दुसऱ्या टप्प्यात सुरक्षा आणि इम्यूनोजेनिसिटीच्या माहितीच्या आधारे डोज तयार करता येतील त्यासाठी कमिटी फर्मकडून माहिती मागवण्यात आली होती. 

covaxin-

भारत बायोटेकच्या प्लॅननुसार कोवॅक्सिनचे शेवटच्या टप्प्यातील चाचणी दिल्लीव्यतिरिक्त उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब आणि आसाममध्ये होणार आहे. कंपनीने फेब्रुवारीपर्यंत शेवटच्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम दिसून येतील अशी आशा व्यक्त केली आहे. त्यानंतर लसीच्या  वितरणाची परवागनी घेण्यासाठी निवेदन दिलं जाईल.  भारत बायोटेकने आपल्या कोरोना लसीत Alhydroxiquim-II  नावाचे कंपाऊड जोडले आहे. यामुळे लसीचा परिणाम अधिक चांगला दिसून येण्यासाठी मदत होईल. तसंच व्हायरसच्या संक्रमणापासून दीर्घकाळ सुरक्षा मिळवता येऊ शकते. ही लस दिल्यानंतर शरीरात एंटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे दीर्घकाळपर्यंत रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यास मदत होते. रोज ग्रीन टी, कॉफी प्यायल्याने टळू शकतील 'या' आजारांमुळे  होणारे मृत्यू, नव्या रिसर्चमधून दावा

कोवॅक्सिन व्यतिरिक्त भारतात दोन कोरोना लसीची चाचणी सुरू आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड आणि एक्स्ट्राजेनका यांच्यासह भागिदारी केली आहे. कंपनीने कोविशिल्डचे परिक्षण सुरू केले आहे. याव्यतिरिक्त झायडल कॅडींला ही कंपनीही लस  तयार करण्यात सगळ्यात पुढे आहे. अन्य कंपन्याही  लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 'मास्क' च्या किंमतीवर आता सरकारचे नियंत्रण; काळाबाजार रोखणार, वाचा नव्या किमती

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bharat biotech corovirus vaccine covaxin phase-3 trial to begin next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.