वेळीच स्वतःवर आवर घाला; मोबाइलच्या अतिवापराने ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’चा धोका, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 18:10 IST2025-09-29T18:09:58+5:302025-09-29T18:10:30+5:30
Poor posture problems: 50% भारतीयांना क्रॉनिक पाठदुखीचा त्रास!

वेळीच स्वतःवर आवर घाला; मोबाइलच्या अतिवापराने ‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’चा धोका, जाणून घ्या...
Poor posture problems: मोबाइलवर तासन्तास चॅटिंग करणे असो किंवा लॅपटॉपवर बसून काम करणे असो...यासाठी शरीर मान झुकवूनच काम केले जाते. परिणामी, मान व मानेच्या भोवतालच्या स्नायूंवर खूप ताण येतो, ज्यामुळे मानदुखी आणि स्नायूंचा ताठरपणा जाणवतो. ही समस्या केवळ वृद्धांमध्येच नाही, तर तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
50% भारतीयांना क्रॉनिक पाठदुखीचा त्रास
एका संस्थेच्या रिपोर्टनुसार, भारतात सुमारे ५० टक्के लोकांना क्रॉनिक बॅक पेनचा सामना करावा लागत आहे. ही आकडेवारी काही वर्षांपूर्वीची आहे, त्यामुळे आताच्या काळात यामध्ये खूप वाढ झाली असण्याची शक्यता आहे.
‘टेक्स्ट नेक सिंड्रोम’ म्हणजे काय?
तासंतास मोबाईलवर किंवा स्क्रीनसमोर मान झुकवून बसल्यामुळे जी लक्षणे दिसतात, त्याला Text Neck Syndrome म्हणतात. यामध्ये मान आणि खांद्यामध्ये वेदना, मान व डोक्यातील स्नायूंमध्ये अकड, हात सुन्न होणे, सततचा डोकेदुखी आणि सर्व्हायकल स्पॉन्डिलायटीस सारखी स्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. हे त्रास पूर्वी 40-50 वयोगटात जास्त दिसत होते, पण आता 18-25 वयोगटातील युवक-युवतींमध्येही ही दिसू लागली आहेत.
मोबाईल वापरताना मानेवर किती वजन पडते?
"Sit Strong" या पुस्तकामध्ये लेखिका हॅरियट ग्रिफे यांनी मान झुकवून बसण्यामुळे मानेवर किती भार पडतो, हे स्पष्ट केले आहे.
मान झुकण्याचा कोन मानेवर पडणारा भार
0° (सरळ बसल्यास) 4.5 – 5 किलो
15° झुकल्यास 12 किलो
30° झुकल्यास 18 किलो
45° झुकल्यास 22 किलो
60° झुकल्यास 27 किलो