शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

CoronaVirus News: फायझर पाठोपाठ मॉडर्नाकडून गुड न्यूज; कोरोनावरील लस ९४.५% प्रभावी

By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 9:45 PM

कोरोना संकटात सापडलेल्या अमेरिकेतून जगासाठी दोन दिलादायक बातम्या

मुंबई: जगातील कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढत आहे. भारतात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असला तरीही अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. अमेरिकेत दिवसाकाठी कोरोनाचे सव्वा ते दीड लाख रुग्ण आढळून येत असल्यानं आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. या पार्श्वभूमीवर आता मॉडर्ना कंपनीनं दिलासादायक माहिती दिली आहे. मॉडर्ना कंपनीनं तयार केलेली कोरोनावरील लस ९४.५ टक्के यशस्वी ठरली आहे.मॉडर्ना कंपनीची लस तिसऱ्या टप्प्यात आहे. या टप्प्यातील सुरुवातीचे निष्कर्ष हाती आले आहेत. कोरोनावरील लस ९४.५ टक्के यशस्वी ठरल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. गेल्या आठवड्यात फायझरनं कोरोनावरील लस ९० टक्के प्रभावी ठरल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता मॉडर्ना कंपनी ९४.५ टक्के प्रभावी ठरली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या अमेरिकन आहेत.बहुतांश लसी तिसऱ्या टप्प्यात सुरुवातीला ५० ते ६० टक्के प्रभावी ठरतात. मात्र फायझर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसींचे निष्कर्ष अपेक्षेपेक्षा अधिक चांगले आहेत. मात्र कोरोना लसीचं वितरण सुरू करण्यापूर्वी अधिक माहिती उपलब्ध होणं गरजेचं आहे. कोरोना लसीच्या सुरक्षेशी संबंधित अधिक माहिती मिळाल्यानंतरच नियामकांकडून लसींना मंजुरी मिळते. नियामकांनी लवकर परवानगी दिल्यास डिसेंबरपासून अमेरिकेत दोन्ही लसींचा आपत्कालीन वापर सुरू होईल.रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना लसीच्या ६ कोटींचे डोस उपलब्ध होऊ शकतात. पुढील वर्षी या दोन लसींचे १०० कोटी डोस निर्माण करण्याचा कंपन्यांचा मानस आहे. हे डोस अमेरिकेसाठी वापरण्यात येतील. अमेरिकेची लोकसंख्या जवळपास ३३ कोटी इतकी आहे. त्यामुळे १०० कोटी डोस अमेरिकेच्या गरजेपेक्षा अधिक असतील.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या