फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 14:04 IST2025-02-03T14:03:06+5:302025-02-03T14:04:14+5:30
Lungs Cleaning Drink : फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही गोष्टी टाकून प्यायल्यास फुप्फुसांची आतून सफाई होईल.

फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर!
Lungs Cleaning Drink : आजकालचं वाढतं प्रदूषण, धूळ-माती, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुप्फुसावर वाईट प्रभाव पडत आहे. फुप्फुसांमध्ये अनेक विषारी तत्व जमा होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते आणि इतरही समस्या होतात. आजकाल लोक स्मोकिंगही भरपूर करतात. त्यामुळे फुप्फुसांवरील दबाव वाढत आहे. अशात फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही गोष्टी टाकून प्यायल्यास फुप्फुसांची आतून सफाई होईल.
फुप्फुसाच्या सफाईसाठी खास ड्रिंक
मध - मधात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-वायरल गुण असतात, जे फुप्फुसांचा इन्फेक्शनपासून बचाव करतात.
लिंबू - लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे एक अॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि फुप्फुसाला यापासून अनेक फायदे मिळतात.
आले - आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे फुप्फुसावरील सूज कमी करण्यास मदत करतात.
हळद - हळदीमध्ये करक्यूमिन असतं. हे एक अॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. ज्यानं फुप्फुसाची सफाई करण्यास मदत मिळते.
कसं बनवाल आणि प्याल?
एक ग्लास कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस, एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चतुर्थांश चमचा हळद पावडर टाका. हे चांगलं मिक्स करा आणि हळूहळू प्या. हे खास ड्रिंक तुम्ही सकाळी उपाशीपोटी किंवा रात्री झोपण्याआधी पिऊ शकता.
कसा मिळतो फायदा?
कोमट पाण्यात मिक्स केलेल्या या गोष्टींमुळे फुप्फुसांमध्ये जमा विषारी तत्व किंवा कफ सहजपणे बाहेर पडतात. मध आणि लिंबानं फुप्फुसाचा इन्फेक्शनपासून बचाव होतो. तर आले आणि हळदीनं सूज कमी होते.
इतरही फायदे
वरील गोष्टी कोमट पाण्यात टाकून नियमितपणे प्यायल्यानं केवळ फुप्फुसं आतून साफ होतात असं नाही तर आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. या ड्रिंकनं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, पचन तंत्र मजबूत होतं आणि त्वचाही हेल्दी होते. फुप्फुसं साफ आणि हेल्दी ठेवण्यासाठी कोमट पाण्यात मध, लिंबू, आले आणि हळद मिक्स पिणं एक प्रभावी आणि नॅचरल उपाय आहे.