शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

साधी डोकेदुखी म्हणून कराल दुर्लक्ष तर होईल पश्चाताप, असू शकतो 'हा' गंभीर आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 11:50 IST

इतर गोष्टी जसे की डोकं सुन्न पडणे, मुंग्या येणे, मळमळ होणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात (Migraine Cause Numbness, Tingling, Nausea, Vomiting, Sensitivity To Light And Sound). त्याचबरोबर अनेकजणांना मायग्रेनमुळे डोकं दुखत असताना प्रकाश आणि आवाजदेखील सहन होत नाही.

मायग्रेन ही एक गंभीर न्यूरोलॉजिकल (Migraine Is A Serious Neurological Condition) समस्या आहे. जी वाढल्यास इतर समस्या आणि आजारांना कारणीभूत ठरते. डोकेदुखी (Headaches) हे मायग्रेनचे प्रारंभिक लक्षण आहे. मात्र लोक अनेकदा डोकेदुखीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मायग्रेन वाढत जाते आणि त्यामुळे केवळ डोकेदुखीच नाही. तर इतर गोष्टी जसे की डोकं सुन्न पडणे, मुंग्या येणे, मळमळ होणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात (Migraine Cause Numbness, Tingling, Nausea, Vomiting, Sensitivity To Light And Sound). त्याचबरोबर अनेकजणांना मायग्रेनमुळे डोकं दुखत असताना प्रकाश आणि आवाजदेखील सहन होत नाही.

मायग्रेनचा गंभीर परिणामांमध्ये एकदा मायग्रेनचा झटका (Migraine Attack) आला की तो काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत टिकू शकतो. त्यासोबतच या वेदना खूप तीव्र होऊ शकतात. यामुळे तुमच्या दैनंदिन कामांमध्येदेखील व्यत्यय येतो. मायग्रेन असणाऱ्या काही लोकांना चेतावणी लक्षण म्हणून डोकेदुखीच्या आधी किंवा डोकं दुखत असताना काही भ्रम (Migraine Aura) होतात. अचानक प्रकाशाचा झोत दिसणे किंवा काळे मोठे ठिपके दिसणे. यासोबतच चेहऱ्याच्या एका बाजूला, हाताला किंवा पायाला मुंग्या येणे आणि बोलण्यात अडचण निर्माण होणे. या समस्यादेखील जाणवतात. मात्र अद्यापही संशोधकांना मायग्रेनचे निश्चित कारण ओळखता आलेले नाही. हेल्थलाइनच्या एका रिपोर्टनुसार, 'मायग्रेनचे कारण मेंदूच्या ऍबनॉर्मल ऍक्टिव्हिटीशी संबंधित असू शकते.'

मायग्रेन ट्रिगरज्या गोष्टींमुळे मायग्रेन होतो त्यांना ट्रिगर (Migraine Triggers) असे म्हणतात. हे ट्रिगर वेगवेगळे नसू शकतात. चुकीचे अन्नपदार्थ खाणे हेदेखील मायग्रेनचे एक ट्रिगर आहे. हेल्थलाइनच्या मते, प्रिझर्व्हेटिव्ह नायट्रेट, आर्टिफिशियल स्वीटनर एस्पार्टम आणि फ्लेवर एन्हांसर मोनोसोडियम ग्लूटामेट (MSG) यांसारख्या अनेक पदार्थांमुळे देखील मायग्रेन होऊ शकतो. त्याचबरोबर शरीरात होणारे हार्मोनमधील बदल, मानसिक ताण, तीव्र प्रकाश किंवा मोठा आवाज, झोपेच्या वेळेमध्ये झालेले बदल, अति शारीरिक परिश्रम, वातावरणातील बदल किंवा काही औषधींचा प्रभावामुळेदेखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

मायग्रेनचे प्रकारमायग्रेनचे मुख्यत्वे दोन (Types Of Migraine) प्रकार असतात. ऑरासह मायग्रेन (Migraine With Aura) आणि ऑराशिवाय मायग्रेन (Migraine Without Aura). ज्या लोकांना आभासाविना मायग्रेनचा त्रास होतो त्यांचे डोके खूप दुखते आणि डोक्यावर दणदण काहीतरी आदळल्यासारख्या वेदना होतात. हा त्रास मध्यम ते गंभीर असू शकतो. अशा लोकांना चालताना किंवा पायऱ्या चढताना त्रास होऊ शकतो. ज्या लोकांना आभासासह मायग्रेनचा त्रास होतो. अशा लोकांचे डोके तर भयंकर दुखतेच. मात्र त्याबरोबर काही आभासही होतात. जे या त्रासात आणखी भर घालतात. सहा प्रकारच्या मायग्रेनमुळे बोलण्यात आणि हालचाल करण्यात अडचण येऊ शकते.

मायग्रेनचा एक तिसरा प्रकारदेखील आहे, हा प्रकार जुना आणि आधीच्या दोन प्रकारांचे मिश्रण असू शकतो. मायग्रेनचा हा प्रकार अनेक महिने टिकून राहू शकतो आणि एकदा हा त्रास सुरु झाल्यास तो सलग आठ होऊ शकतो.

मायग्रेनवर उपचारमायग्रेन हा एक असा विषय आहे, ज्याला सामोरे जाण्यासाठी स्पष्ट संकल्पना आवश्यक आहे (Migraine Treatment). हेल्थलाइननुसार, 'अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की, मायग्रेनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने त्याचा पॅटर्न समजून घेणं आवश्यक आहे. असे कोणते ट्रिगर्स आहेत जे त्या व्यक्तीच्या मायग्रेनसाठी जबाबदार असतात. त्यांचा अभ्यास करून ते टाळणं गरजेचं आहे.' मायग्रेनच्या रुग्णांसाठी हायड्रेटेड राहणे हा आणखी एक सामान्य सल्ला आहे. रात्रीची चांगली झोप आणि नियमित व्यायाम देखील मायग्रेनला तुमच्या मेंदूचा ताबा घेण्यापासून आणि त्रासदायक वेदना होण्यापासून रोखण्यासाठी खूप मदत करू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स