काय सांगता! किस केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 12:51 PM2019-12-06T12:51:15+5:302019-12-06T12:51:34+5:30

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा तुम्हाला आवडणारा उपायही करून बघा.

Mental and physical health benefits of kissing | काय सांगता! किस केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं?

काय सांगता! किस केल्याने झटपट कमी होतं वजन, जाणून घ्या कसं?

googlenewsNext

प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम म्हणून किस करण्याकडे पाहिलं जातं. अनेकजण किस करून त्यांचं प्रेम व्यक्त करतात. मग ते हा किस गालावर, मानेवर किंवा हातावर कुठेही करू शकतात. अनेकजण सेक्स अशा दृष्टीने किसकडे बघतात. ते तसं असेलही. पण किस करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. विज्ञानानुसार, किस केल्याने लोकांना एनर्जी मिळते आणि व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो.

तुम्ही प्रेमाचे नवे खेळाडू असाल किंवा अनुभवी महारथी. तुम्ही कधीना कधी कुणाला ना कुणाला किस केलं असेलच. पण तुम्ही अर्थातच त्यावेळी किस केल्याने काय फायदे होतात याकडे लक्ष दिलं नसेल. चला तर मग किस करण्याचे आरोग्यासाठी तुम्हाला कसे फायदे होतात.  

(Image Credit : menshealth.com)

एका रिसर्चनुसार, जगभरातील १६८ संस्कृतींपैकी केवळ ४६ टक्केच प्रेम व्यक्त करण्यासाठी पार्टनरला किस करतात. प्राध्यापक जानकोवायक यांच्यानुसार, 'किस' करणं हे वेस्टर्न कल्चरमधून आलंय. एका पिढीकडून ही पद्धत दुसऱ्या पिढीकडे गेली.
किस करण्याचे आरोग्याला होणारे फायदे....

१) हॅपी हार्मोन्स

(Image Credit : express.co.uk)

किस केल्याने तुम्हाला आनंद मिळतो. पण कधी तुम्ही हा आनंद का आणि कसा मिळतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? मुळात किस करतेवेळी मेंदूत हॅपी हार्मोन्स रिलीज होता. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. या हार्मोन्समध्ये ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरटोनिन यांचा समावेश आहे. याने प्रेमाची भावना वाढते. तसेच याने तुमच्यातील स्ट्रेस हार्मोन कार्टिसोलचं प्रमाणही कमी होतं.

२) कॅलरी बर्न करण्यास मदत

किस केल्याने चेहऱ्याच्या मसल्सना फायदा होतो आणि याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅलरी बर्न होता. आता वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न करणं किती महत्वाचं आहे. हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. तुमच्या एका किसने प्रति मिनिटाला २ ते २६ कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा फॅट बर्न करण्यासही मदत मिळते.

वजन कमी करण्यावर झालेल्या एका रिसर्चनुसार, किस केल्याने कॅलरी बर्न होतात, ज्याचा तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदा होतो. ट्रेड मिलवर जॉगिंग केल्याने १ मिनिटात तुम्ही जवळपास ११ कॅलरी बर्न करता आणि तेच रिपोर्ट्सनुसार किस करून एका मिनिटात तुम्ही २ ते २६ कॅलरी बर्न करू शकता. तसेच फिजिकल होताना किस केल्याने ९ कॅलरी एक्स्ट्रा खर्च होतात. म्हणजे जर तुम्ही २९० किस करत असाल तर तुमचं अर्धा किलो वजन कमी होतं.

३) ब्लड सर्कुलेशन

(Image Credit : belmarrahealth.com)

किस केल्याने शरीरात लव्ह हार्मोन म्हणजे ऑक्सिटॉसिनचं प्रमाण वाढतं आणि तुम्हाला रिलॅक्स वाटतं. सोबतच एड्रेनालिन नावाचे हार्मोन्सही रिलीज होतात. जे हृदयापासून रक्त संपूर्ण शरीरात सर्कुलेट करण्यास मदत करतात. 

४) तणाव होतो कमी

किस केल्याने मेंदूत तणाव वाढवणारे कार्टिसोल हार्मोन्स कमी होतात आणि सिरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे तुमचा थकवा कमी होतो आणि तणावही कमी होतो. तेच दुसरीकडे किस केल्याने फील गुड हार्मोन्स रिलीज होता. ज्याने तुम्हाला तणाव जाऊन आनंद मिळतो. किस करणे, मिठी मारणे आणि आय लव्ह यू बोलणे यानेही तुमचा तणाव कमी होतो.

५) इम्यून सिस्टीम होतं मजबूत

(Image Credit : ai-med.io)

मेडिकल हायपोथेसिसच्या जर्नलमध्ये एका रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, किस केल्याने सायटोमेगालो व्हायरसमुळे एक महिलेची इम्युनिटी सिस्टीम मजबूत होण्यास मदत मिळते. मात्र, या वायरसमुळे बाळाच्या जन्मावेळी समस्या होऊ शकते. खरंतर किस करताना दोन व्यक्ती जे वायरसचं आदान-प्रदान करतात त्याने आपल्या शरीराचं डिफेंसिव्ह मेकॅनिजम मजबूत होतं. २०१४ मधील एका रिसर्चनुसार, कपल करताना त्यांच्या लाळेत आणि जिभेवर इम्यून सिस्टीम मजूबत करणारा मायक्रोबायोटा बॅक्टेरिया आढळतात.


Web Title: Mental and physical health benefits of kissing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.