Meditaion holidays this startup allows 11 extra leaves for meditation | वाह! मेडिटेशन करण्यासाठी 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय ११ दिवसांची जादा रजा

वाह! मेडिटेशन करण्यासाठी 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय ११ दिवसांची जादा रजा

सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात तुम्हाला समजा १० दिवस मिळाले तर किती रिलॅक्स वाटेल ना? ज्या ठिकाणी ना ऑफिसचा ताण, ना वॉट्सअप, ना कोणात्या मेसेजचा रिप्लाय द्यावा लागणार, असे दहा दिवस जे तुम्हाला स्वतःच्या आत डोकावण्यासाठी संधी देतील.  तुमचा विश्वास बसणार नाही पण एका स्टार्टअप कंपनीने आपल्या कर्मचारीवर्गाला मेडिटेशन करण्यासाठी ११ दिवसांची सुट्टी वेगळी दिली आहे. 

धम्म.ऑर्ग च्या मते, मेडिटेशनचा थेट अर्थ जगाला जसे आहे तसे पाहणे आहे, त्याला कोणत्याही कल्पना, वस्तू इत्यादींशी जोडणे नाही. धम्म त्याला 'स्व-अवलोकन' च्या माध्यमातून 'स्वयं-परिवर्तन' करण्याची पद्धत म्हणतात. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही मेडिटेशनचा सराव करतात.

कोणती स्टार्टअप कंपनी देतेय ११ सुट्टया?

सिंगापूरस्थित सॉफ्टवेअर सर्व्हिस स्टार्टअप कंपनी केपिलरी टेक्नॉलॉजीने डिसेंबर २०२० पासून आपल्या कर्मचार्‍यांना 11 दिवसांची 'मेडिटेशन सुट्टी' जाहीर केली आहे. कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश रेड्डी हे भारतीय वंशाचे आहेत. फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी पहिला मेडिटेशन अभ्यासक्रम केला. त्यानंतर, कंपनीच्या सीओओलाही या कोर्ससाठी पाठविण्यात आले आणि नंतर सर्व कर्मचार्‍यांना त्याचा अनुभव घेण्यासाठी ११ दिवसांची स्वतंत्र रजा देण्याचे धोरण केले. आता गायीच्या शेणापासून घर रंगवा; 'गोबर पेंटचे' गडकरींनी सांगितले ८ फायदे

अनीश रेड्डी नवीन वर्षाच्या सुट्टीत ऑरोविल, पुडुचेरी येथे आले होते. त्यानंतर त्यांनी मेडिटेशनचा अनुभव लिंक्डइनवर शेअर केला. त्यांनी लिहिले की, 'मेडिटेशन जादू केल्यासारखे केले. यामुळे अनेक वर्षांपासून असलेल्या वैयक्तिक तणावातून मुक्त झाल्याप्रमाणे वाटले. मला  डोक्यावरुन कोणतंतरी ओझे उतरलं आहे असं वाटत होतं. मन शांततेने भरलेले होते आणि खूप उत्साही होते. ते कसे आणि का कार्य करते हे त्यांना माहिती नाही, पण मी मेडिटेशन नुकतेच केले." बोंबला! आईनं चुकून भलतीच क्रिम लावली अन् चिमुरड्या लेकाचा चेहरा बघा कसा झाला....

रेड्डी म्हणाले की, ''फेब्रुवारी 2020 च्या अगोदरही त्यांनी 2016 मध्ये मेडिटेशन अभ्यासक्रम घेण्याचा प्रयत्न केला होता. पण वेळेअभावी मी हे करू शकलो नाही. आता विपश्यना हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा एक भाग आहे. तो दररोज अर्ध्या तास वेळ त्यासाठी देतो आणि आपल्या कंपनीतचीही जाहिरात करतो.''

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Meditaion holidays this startup allows 11 extra leaves for meditation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.