बोंबला! आईनं चुकून भलतीच क्रिम लावली अन् चिमुरड्या लेकाचा चेहरा बघा कसा झाला....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 07:51 PM2021-01-12T19:51:19+5:302021-01-12T19:54:14+5:30

Trending Viral News in Marathi : महिलेनं आपल्या ५ वर्षांच्या मुलाच्या  तोंडाला अशी क्रिम लावली. ज्यामुळे त्याचा चेहरा फुगत  गेला. याशिवाय तोंडावर केससुद्धा उगवायला सुरूवात झाली. 

China baby face swelling like balloon after using a cream | बोंबला! आईनं चुकून भलतीच क्रिम लावली अन् चिमुरड्या लेकाचा चेहरा बघा कसा झाला....

बोंबला! आईनं चुकून भलतीच क्रिम लावली अन् चिमुरड्या लेकाचा चेहरा बघा कसा झाला....

Next

(Image Credit-NEWSFLASH)

हेल्दी, निरोगी मुलं नेहमी गुटगुटीत दिसतात. त्यांच्या शरीराच्या रचनेमुळे ते नेहमी क्यूट दिसतात.  गुबगुबीत गाल पाहिले की सगळ्यात आधी गाल ओढण्याचा मोह होतो. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कारण या लहान मुलाचा चेहरा गरजेपेक्षा जास्त फुगला आहे. चीनच्या झांगझोऊ प्रातांतील एका महिलेनं आपल्या ५ वर्षांच्या मुलाच्या  तोंडाला अशी क्रिम लावली. ज्यामुळे त्याचा चेहरा फुगत गेला. याशिवाय तोंडावर केससुद्धा उगवायला सुरूवात झाली. 

दोन महिन्यांपासून त्याची आई हीच क्रिम लावत होती

मिररच्या रिपोर्ट्सनुसार या मुलाची त्वचा खूप कोरडी होती. म्हणून त्यांची आई  सतत ही क्रिम  लावायची. काहीवेळानंतर या चिमुरड्याचा चेहरा फुगू लागला.  जास्त चेहरा मोठा दिसून लागल्यानंतर मुलाला रुग्णालयात घेऊन गेले. या ठिकाणी तोडांवर कोणत्या क्रिम किंवा साबणाचा वापर करण्यात आला. याची विचारणा करण्यात आली. तेव्हा पालकांनी सांगितले की दोन महिन्यांपासून ही क्रिम तोंडाला लावत होतो.   भय इथले संपत नाही! जपानमध्ये सापडला कोरोनाचा नवा स्ट्रेन; आरोग्य मंत्रालयाची महत्वाची माहिती

क्रिम पाहिल्यानंतर डॉक्टरांचे डोळे उघडेच राहिले. कारण ती एक स्टेरॉईड क्रिम होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही क्रीम स्टेरॉईड आहे. ही क्रिम मोठी माणसं लावतात ते ही खूप कमी प्रमाणात वापर करतात. असं असूनही या मुलाच्या आईनं वारंवारं ही क्रिम लहान मुलाच्या तोंडाला लावल्यानं त्याचा चेहरा असा झाला. डॉक्टरांनी आता या क्रिमचा वापर पूर्णपणे बंद करायला सांगितला असून हळू हळू या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. माणुसकीला काळीमा! मुक्या जीवाला कारच्या मागे बांधून संपूर्ण शहरभर फरपटत नेलं

Web Title: China baby face swelling like balloon after using a cream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.