एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:22 IST2025-07-08T16:21:38+5:302025-07-08T16:22:19+5:30
Medicine dispose: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने गाईडलाईन जारी केली आहे.

एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
Medicine dispose: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने एक गाईडलाईन जारी केली आहे. यात अशा काही औषधांबद्दल सांगितले आहे, जे एक्सपायर झाल्यानंतर कचऱ्यात फेकण्याऐवजी, शौचालयात फ्लश करावेत. यात अशा १७ औषधांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे अत्यंत व्यसनाधीन आणि आरोग्यास हानिकारक आहेत.
सीडीएससीओने ज्या औषधांसाठी फ्लश करण्यासाठी गाईडलाईन जारी केली आहे, त्यापैकी बहुतेक औषधे पेन किलर आणि अँटी एंझायटीच्या आहेत. ही औषधे मादक पदार्थांच्या श्रेणीत येतात. ही औषधे चुकीच्या व्यक्तीच्या हातात पडली किंवा चुकून सेवन केली, तर ती घातक ठरू शकतात. काही लोक त्यांचा वापर नशेसाठी देखील करू शकतात. ही औषधे फ्लश करणे योग्य मानले जाते. ही औषधे पर्यावरणाला गंभीर नुकसान करत नाहीत, किंवा पाणी प्रदूषित करत नाहीत. त्यामुळे फ्लश करणे योग्य आहे.
पाहा यादी
- Fentanyl
- Tramadol
- Morphine Sulphate
- Buprenorphine
- Methylphenidate
- Tapentadol
- Oxycodone
- Diazepam
- Hydrocodone
- Methadone
- Meperidine
- Oxymorphone
- Demerol
- Dilaudid
- Exalgo
- Nucynta
- Ritalin
घरात ठेवलेली सर्व एक्सपायर्ड औषधे शौचालयात टाकता येतात का?
याबाबत आरएमएल रुग्णालयातील औषध विभागाचे डॉ. पुनीत कुमार गुप्ता म्हणतात की, अँटीबायोटिक्स पाणी प्रदूषित करू शकतात. बीपी, शुगर किंवा थायरॉईड औषधे यासारखी सामान्य औषधेदेखील नद्या, नाले आणि जमिनीत जाऊन पाणी प्रदूषित करतात. सरकारने अशा औषधांसाठी ड्रग टेक-बॅक प्रोग्राम सुरू केला आहे. यामध्ये, खराब झालेली किंवा न वापरलेली औषधे रुग्णालये आणि घरातील कचऱ्याच्या डब्यांमधून गोळा केली जातात आणि सुरक्षित पद्धतीने नष्ट केली जातात.