नव्या वर्षात वर्कप्लेस कसं ठेवाल हेल्दी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 11:32 IST2019-01-03T11:07:56+5:302019-01-03T11:32:29+5:30
नव्या वर्षात नव्या सुरुवातीसाठी ऑफिसमध्ये स्पेसचं वातावरण हेल्दी ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत.

नव्या वर्षात वर्कप्लेस कसं ठेवाल हेल्दी?
(Image Credit : blog.bosch-si.com)
नोकरी करणारे लोक जितका वेळ ऑफिसमध्ये घालवतात तितका वेळ ते दुसरा कुठेही घालवत नाहीत. त्यामुळे त्या जागेचं वातावरणही तितकच हेल्दी असणंही गरजेचं आहे. नव्या वर्षात नव्या सुरुवातीसाठी ऑफिसमध्ये स्पेसचं वातावरण हेल्दी ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत.
छोटे ब्रेक घ्या
जर तुम्ही ऑफिसमध्ये ८ ते ९ तासांचा वेळ घालवत असाल तर गरजेचं आहे की, थोडा वेळ तुम्ही तुमच्या आरोग्यासाठीही काढा. फार जास्त वेळासाठी एकाच जागेवर बसून राहू नका. बसल्या बसल्या तुम्ही छोटे छोटे वर्कआउट्स करु शकता. डेस्कवर काम करणाऱ्यांची समस्या ही असते की, ते तासंतास खुर्चीवर बसून राहतात. त्यामुळे त्यांना खांधेदुखी, पाठदुखी अशा समस्या होतात. या समस्या होऊ नये, यासाठी कामाच्या मधे मधे छोटे छोटे ब्रेक घेत रहा. याने तुम्हाला आराम मिळेल.
फ्रेश वातावरण
कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि मूड दोन्हीही फ्रेश रहाव यासाठी स्वच्छ वातावरणात श्वास घ्या. असं केल्याने कामातही चांगलं लक्ष लागतं आणि काम चांगलं होतं. वर्कप्लेसवर तुम्ही एअर प्युरिफायर लावू शकता.डेस्कवर शक्य असल्यास छोटी छोटी झाडे ठेवू शकता.
स्टॅंडिंग वर्कस्टेशनचं चलन
आजकाल ऑफिसेसमध्ये स्टॅंडिंग वर्कस्टेशन स्टेशन करण्याचा ट्रेन्ड सुरु आहे. फार जास्त खुर्चीवर बसल्याने व्यक्तीला वेगवेगळ्या आरोग्यदायी समस्या होतात. बीन बॅगवर बसून आरामात काम करण्यासोबतच तुम्ही स्टॅंडिंग वर्कस्टेशन म्हणजेच उभं राहून काम करुनही या समस्यांपासून बचाव करु शकता. काही वेळ खुर्चीवर बसून काम करा आणि काही वेळ उभं राहून याने तुमच्या कॅलरीही बर्न होतील आणि कामात मजाही येईल.
सकारात्मक ऊर्जा
वर्कप्लेस केवळ काम करण्याची जागा नाहीये. कर्मचाऱ्यांना रिलॅक्स वाटावं यासाठी ऑफिसमध्ये आजकाल जिम, लायब्ररी, पूल टेबल, रिलॅक्सिंग एरिया सुद्धा तयार केला जातो. याचं कारण हे आहे की, ऑफिसमध्ये आल्यावर लोकांना स्ट्रेस वाटू नये. मेंदू, शरीर आणि काम यात समतोल साधल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो. जर तुमच्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक असेल तर कामही चांगलं होतं.
सजवलेला डेस्क
तुमचं वर्कस्टेशन पर्सनलाइज करा. म्हणजे तुमचा डेस्क तुम्ही सजवू शकता. आजूबाजूला रंगीबेरंगी वस्तू ठेवू शकता. घाणेरडं किंवा अस्ताव्यस्त डेस्कने नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे डेस्क नेहमी स्वच्छ आणि सजवून ठेवा. याने तुम्हाला चांगलं आणि फ्रेश वाटेल. तुमचे, परिवाराचे फोटोही तुम्ही लावू शकता, याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळण्यासही मदत मिळते.