शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
3
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
4
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
5
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
6
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
7
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
8
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
9
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
10
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
11
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
12
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
13
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
14
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
15
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
16
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
17
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
18
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
19
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
20
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 

Mahashivratri : उपवासाचे फायदे वाचून उपवास न करणारे ही करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 2:27 PM

उपवास करताना करू की नको असा विचार करत असाल तर हे फायदे वाचून महाशिवरात्रीचा उपवास नक्की कराल.

(image credit- 4 to40)

उद्या महाशिवरात्र आहे. मोठया उत्साहात महाशिवरात्रीला अनेकजण उपवास करतात. अनेकजण दिवसभर काहीही न खाता फक्त पाणी पितात आणि दिवसाच्या शेवटी किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतात. महाशिवरात्री, आषाढी एकादशी अशा अनेक महत्वांच्या दिवशी उपवास ठेवले जातात. याव्यतिरिक्त अनेकजण आठवड्यातून एका दिवशी उपवास धरत असतात. उपवास करणे ही धार्मिक बाब असली तरी उपाशी राहण्याचे काही वैज्ञानिक फायदेही आहेत. त्याचा आपल्या शरीराला फायदाच होतो, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. जाणून घेऊयात उपवास करण्याचे 10  फायदे.

उपवास केल्याने चांगली भूक वाढते

तुम्ही जर दिवसभरात तीन-चार वेळा अन्न ग्रहण करीत असाल तर तुम्हाला खरी भुक म्हणजे काय हे माहिती नसेल. कधीतरी 12 ते 24 तास उपवास करुन बघा. त्यानंतर भुक म्हणजे काय असते ते समजेल. याने तुमचे हार्मोन्स रेग्युलेट होतात. शरीरासाठी हे चांगले आहे.

उपवास केल्याने भोजनपद्धती सुधारते

बिंग इटिंग डिसऑर्डरने ग्रस्त असलेल्या लोकांनी उपवास केल्यास फायदा होतो. बऱ्याचदा कामाचे तास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींमुळे खाण्याची पद्धती विस्कळित झालेली असते. उपवासाने ती सुधारते. त्यामुळे अनेक रोग तुमच्यापासून दूर राहतात. प्रकृती ठणठणीत राहते.

वजन कमी होतं

उपवास केल्याने शरीराची जाडी कमी होते. जेवणाच्या पद्धतीत बदल करुन फास्टिंग केल्यास फॅट सेल बर्न करण्यास मदत होते. साखरेऐवजी फॅटमधून एनर्जी घेण्याचे शरीराला संकेत मिळतात. एखाद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जर लो बॉडी फॅट बर्न करायचे असेल तर अॅथलेट्स उपवास करतात.

उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते

उपवास केल्याने इन्शुलिन सेन्सिटिव्हिटीवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येते. कारबोहायड्रेड (साखर) सहन करण्याची शारीरिक क्षमता वाढल्याचे जाणवते. उपवास केल्याने इन्शुलिन रक्तातून ग्लुकोज घेण्यासाठी सेल्सना संकेत देतात, असे एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे. मेटॅबोलिझमची गती वाढते

उपवास केल्याने पचनशक्तीला जरा आराम मिळतो. त्यामुळे मेटॅबोलिझमला कॅलरीज बर्न करण्यासाठी संधी मिळते. जर तुमची पाचनशक्ती कमकुवत असेल तर फॅट बर्न करण्यासाठी आणि फुड मेटॅबोलाईज करण्याची क्षमता कमी होते. उपवास केल्याने मेटॅबोलिझमची कार्यक्षमता वाढते. लॉंगिटीव्हिटीत वाढ होते

(image credit-copeman healhcare centre)

तुम्ही कमी खात असाल तर जास्त काळ जगता हे सत्य आहे. भोजनाची योग्य पद्धती राखली तर लोकांची जिवनमान उंचावते आणि वाढते हे काही संस्कृतींमध्ये सिद्ध झाले आहे. मेटॅबोलिझम कमकुवत झाल्याने वयोमान वाढते. तुम्ही म्हातारे दिसू आणि वागू लागता. त्यामुळे शरीर तरुण ठेवण्यासाठी उपवास करायलाच हवा. मेंदूची गती वाढते

उपवास केल्याने ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर (BDNF) नावाचे प्रोटिनची निर्मिती चांगल्या प्रमाणात होते. या प्रोटिनने मेंदुची गती वाढते. कार्य चांगल्या पद्धतीने पार पडते इम्युन सिस्टीममध्ये सुधारणा होते

कॅन्सर सेल्सचे फॉरमेशन थांबवणे, फ्रि रॅडिकल डॅमेज कमी करणे, शरीरातील इन्फ्लेमेटरी कंडीशन नियंत्रित करणे आदी कार्ये उपवासातून साध्य केली जाऊ शकतात. जर एखादा प्राणी आजारी पडला तर तो आराम करण्याऐवजी आधी खाणे बंद करतो. कारण शरीरातून त्याला इंटर्नल सिस्टिमवरील ताण कमी करण्याचे अंतर्गत संकेत मिळतात. त्यामुळे शरीर एखाद्या इन्फेक्शनला जोमाने लढा देऊ शकते. शरीरिक क्षमता वाढतात

(image credit-science)

वाचन, मेडिटेशन, योगा, मार्शल आर्ट आदी कामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे. शरीरातील पाचन व्यवस्थेत अन्न कमी असेल तर शरीरात जास्त एनर्जी राहू शकते. त्याने काम करण्याची ऊर्जा वाढते. मन संतुलित राहते. नवनवीन कल्पना मनात जन्म घेतात. उत्साह वाढतो. ( हे पण वाचा-हिवाळ्यात जास्त झोपल्यामुळे वाढलेलं वजन झटपट कमी करण्यासाठी करा ही ५ योगासन!) स्कीन चांगली राहते

उपवास केल्याने पाचनक्षमतेला आराम मिळतो. अशा वेळी शरीराला इतर क्रियांकडे लक्ष देण्यासाठी पुरेशी वेळ मिळते. त्यामुळे स्कीन चांगली राहणे, केस मजबूत होणे आदी कामे या काळात पार पाडली जातात. शिवाय शरीरातील अनावश्यक घटक यावेळी बाहेर टाकले जातात. शरीर शुद्ध होते. ( हे पण वाचा-बिअर्ड लूकची हौस असेल तर जाणून घ्या दाढी येण्याचं योग्य वय काय?)

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीJara hatkeजरा हटके