(image credit- full data backup)

हिवाळ्याचे दिवस गेल्यानंतर आपल्याला काहीतरी नवीन ट्राय करावसं वाटत असतं.  कारण उन्हाळ्याचा ऋतु सूरू झाल्यानंतर कपड्यांमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स येत असतात. पण तुमच्या लटकत असलेल्या पोटामुळे तुम्हाला मन मारून तुम्हाला होतील असे कपडे घालावे लागतात.  असं जर तुमच्या बाबतीत सुद्धा होत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही योगासनांबद्दल सांगणार आहोत. या योगासनांचा वापर करून तुम्ही  उन्हाळ्यात सुद्धा चांगले आणि सुंदर दिसू शकता. 

(image credit- webmd)

हिवाळ्यात खूप आळस आलेला असतो. त्यामुळे आपण अधिकवेळ झोपतो. या सवयीमुळे सगळ्यांचच हिवाळ्यात वजन वाढलेलं असतं. पण तुमचं सुद्धा वजन वाढलं असेल तर टेंशन घेण्यासारखं काहीही नाही. काही सोप्या योगासनांचा वापर करून  तुम्ही वजन कमी करू शकता. त्यामुळे तुमचं मन सुद्धा शांत राहील.

संतुलासन 

हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी पोटावर झोपा.  नंतर तुमचे हात खांद्यांच्या बाजूला ठेवा. आणि आपलं संपूर्ण शरीर हातांच्य जोरावर वर उचला.  गुडघे सरळ ठेवा. तुमचे मनगट आणि खांदे यांवर तणाव यायला हवा. काहीवेळा नंतर पुन्हा आपल्या स्थितीत या.

भुजंगासन

या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. हनुवटी फरशीवर ठेवावी. कोपरे कमरेला टेकलेले. आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा. वर आकाशाकडे पाहावे.  या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो.

पादहस्तासन

हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्ही उभे राहा. त्यानंतर हळूहळू श्वास सोडत आपल्या शरीराला खाली वाकवा. तुमचं नाक गुडघ्याला स्पर्श करेल अशा पध्दतीने हे आसन करा. १० सेकंद तशाच अवस्थेत राहून पुन्हा सरळ व्हा. हे आसन केल्यामुळे तुमची पोटाची चरबी नक्की कमी होईल.  

धनुरासन

हे आसन करण्यासाठी आधी पोटावर झोपा त्यानंतर आपल्या गुडघ्यांना वर उचला. आणि हातांनी टाचा पकडण्याचा प्रयत्न करा. जितका  जास्त वेळ करता येईल तितका जास्त वेळ होल्ड करून आता परत पूर्वस्थितीत या.

चक्रासन

जर तुम्हाला हे आसन करायचं असेल तर तुम्ही घुडघ्यांवर वाका. नंतर दोन्ही जमिनीला स्पर्श करा. शरीराचा कर्व तयार होईल अशा पध्दतीने वाका. आपली मान आणि डोक्याला मागच्या बाजूने वाकवण्याचा प्रयत्न करा.  ही आसनं गरमीच्या काळात तुम्हाला फिट ठेवण्यासाठी फायदेशीर  ठरतील. ( हे पण वाचा-दूध की ज्यूस...सकाळचं पहिलं ड्रिंक म्हणून काय हेल्दी ठरेल?)

Web Title: How to loss weight by doing yogasana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.