सद्या अनेकांना वजन तर कमी करायचंय, पण बिझी शेड्युमुळे लोक वर्कआउटसाठी वेळ काढू शकत नाहीयेत. पण वजन केवळ वर्कआउटनेच कमी होतं असं नाही. काही वेगळ्या उपायांनाही वजन कमी करण्यास मदत मिळते. यातील एक उपाय म्हणजे वेलची. दररोज वेलची खाल्ल्याने पोट आणि कंबरेवरची चरबी कमी होऊ लागते. कशी ते जाणून घेऊ.
खास आहे वेलची
वेलचीचा सुगंध कोणत्याही पदार्थाला वेगळीच टेस्ट देतं आणि हेच कारण आहे की, गोड पदार्थांपासून ते भाज्या आणि बिर्याणीमध्येही याचा वापर होतो. इतकेच नाही तर अनेकदा तोंडाला वेगळी चव देण्यासाठीही वेलची खातात. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की, हिरवी वेलची केवळ स्वाद आणि सुगंधाच्या कामाचीच नाही तर वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरते. रोज जर वेलची खाल्ली तर वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यासाठी रोज ३ वेलची खावीत असे सांगितले जाते. चला जाणून घेऊ वेलचीचे गुण.
फॅट जमा होऊ देत नाही
वेलचीमध्ये फॅट डिपॉझिट होऊ न देण्याचे गुण असतात. याने पोटाच्या आजूबाजूला जमा होणारी चरबी गोठू देत नाही. पोटावरील चरबी ही अनेक मेटाबॉलिक समस्यांचं कारण ठरते. इतकेच नाही तर अशा लोकांना कार्डिओवस्कुल डिजीज होण्याचा धोकाही असतो.
भूक करते कमी
वेलचीमध्ये भूक कमी करण्याचे गुण असतात आणि यानेच वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळतं. अनेकांना भूक नसतानाही काहीना काही खाण्याची इच्छा होते. खासकरून गोड खाण्याची तलब वेलचीमुळे कमी होते. गोड पदार्थ हे वजन वाढण्यासाठी एक मुख्य कारण आहे.
(Image credit : Dr. Samuel Bledsoe)
असा करा वेलचीचा वापर
१) वेलची बारीक करा आणि एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी सेवन करा.
२) चहामध्ये वेलची वापर कराच, पण या चहामध्ये साखरेचा वापर करू नका.
३) वेलचीचा वेगवेगळ्या प्रकारेही वापर करू शकता. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
४) वेलची कधीही सालीसह खावी. याने पचनक्रिया चांगली होण्यासोबतच तोंडाची चवही कायम राहते. तसेच शरीरात फायबरही जातं.
(टिप : वरील टिप्स किंवा सल्ले हे केवळ माहिती म्हणूण वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातील उपाय करण्यापूर्वी किंवा डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)