शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

वजन घटवण्यासाठी लिंबुपाणी भरपूर आहे फायदेशीर, पण 'या' विशिष्ट पद्धतीने तयार करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:09 IST

लिंबूमध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म देखील आढळतात आणि ते वजन कमी करण्यासाठी मदत (Lemon water Benefits) करतात. तसेच यामुळे फ्री रॅडिकल्ससारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकांना आहारावर (Diet) लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. अनियमित आणि चूकीच्या आहारामुळे अनेकांना लठ्ठपणाचा (Obesity) सामना करावा लागत आहे. वजन वाढतं तर लवकर मात्र ते कमी करण्यासाठी (Weight Loss) अनेक प्रयत्न करावे लागतात. अनेक जण व्यायाम, यागा आणि सकाळी धावून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. यासोबतच काही लोक वजन कमी करण्यासाठी आहारत (Weight Loss Diet) बदल करतात आणि काही पेये (Weight Loss Drink) देखील घेतात. तुम्हाला देखील वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे (Lemon water for Weight Loss) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

लिंबू पाणी (Lemon water) आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असते. याशिवाय तुम्हाला वजन कमी करण्यासाठी देखील याची महत होऊ शकते. लिंबूमध्ये सायट्रिक अॅसिडसह व्हिटॅमिनस सी, व्हिटॅमिन बी-6, पोटॅशियम आणि फायबरसारखे शरीराला आवश्यक असलेले घटक आढळतात. लिंबूमध्ये अँटीऑक्सिडन्ट गुणधर्म देखील आढळतात आणि ते वजन कमी करण्यासाठी मदत (Lemon water Benefits) करतात. तसेच यामुळे फ्री रॅडिकल्ससारख्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.

तीन पद्धतींनी पिऊ शकता लिंबू पाणी1) वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि पुदिन्याचे पाणी देखील पिऊ शकता. उन्हाळ्यात पुदिन्यामुळे शरीराला थंडावा जाणवतो. त्यामुळे हे पेय तुम्हाला उन्हाळ्यात अधिक उपयुक्त ठरू शकते. यासाठी एक ग्लास पाण्यात लिंबू आणि पुदिन्याच्या पाणांचा सर घाला. त्यात थोडं काळं मिठ घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पेय प्या. हे दोन्ही पदार्थ लो कॅलरी असतात. त्यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होण्यास मदत होऊ शकते. या पेयामुळे तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. तुम्ही हे पेय दिवसभर पिऊ शकता.

2) वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी पिऊ शकता. अनेक जण आपल्या आहारात या लिंबू पाण्याचा समावेश करतात. यासाठी सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबूचा रस घाला. त्यात एक चमचा मध घाला आणि तयार झालेले पेय प्या. नियमतपणे हे पेय पिल्यास तुम्हाला वजन करण्यास मदत होऊ शकते.

3) आलं आणि लिंबूचं पेय देखील तुम्हाला वजन कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. आल्याचा उपयोग आरोग्यदायी पेय बनवण्यासाठी देखील केला जातो. हे पेय बनवण्यासाठी एक ग्लास पाण्यात लिबूचा आणि आल्याचा रस घाला. यात थोडं काळं मिठ घाला. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. हे पेय तुमचे शरीर डिटॉक्स करण्याचे काम करेल. हे पेय तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता. यामुळे तुम्हाला पोट भरलेले वाटेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स