तुमच्या आरोग्याबाबत खूप काही सांगतात तळपाय, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:17 AM2020-02-15T10:17:15+5:302020-02-15T10:28:14+5:30

पायांद्वारे व्यक्तीच्या कितीतरी सवयींची माहिती मिळवली जाऊ शकते. इतकेच नाही तर पायांवरून व्यक्तीचं आरोग्य कसं आहे याबाबतही सांगता येऊ शकतं.

Know what your feet say about your health | तुमच्या आरोग्याबाबत खूप काही सांगतात तळपाय, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष!

तुमच्या आरोग्याबाबत खूप काही सांगतात तळपाय, 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष!

googlenewsNext

पायांद्वारे व्यक्तीच्या कितीतरी सवयींची माहिती मिळवली जाऊ शकते. इतकेच नाही तर पायांवरून व्यक्तीचं आरोग्य कसं आहे याबाबतही सांगता येऊ शकतं. अनेकांच्या तळपायांवर असे काही निशाण दिसतात जे एखाद्या गंभीर आजाराकडे इशारा करतात. पायांच्या बोटावरील नखांचा रंग बदलणे आणि पाय कधी कधी सून्न होणे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. असे मानले जाते की, तळपायात होणारे बदल अनेक प्रकारच्या आजारांकडे आणि हृदयाचं आरोग्या ठिक नसण्याकडेही इशारा करतात. याचीच काही लक्षणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाय थंड होणे

(Image Credit : health.clevelandclinic.org)

काही लोकांना ही समस्या सामान्य वातावरणातही होते. सामान्यपणे ही समस्या पायांमध्ये व्यवस्थित ब्लड सर्कुलेशन होत नसल्याने होते. ही समस्या तुम्ही व्यायाम आणि योगाच्या माध्यमातून दूर करू शकता. याच्या इतर कारणांमध्ये एनीमिया, सतत थकवा, तंत्रिका तंत्र ठिक नसणे, मधुमेह, हायपोथायरायडिज्म आणि हायपोथर्मियासारख्या आजारांचाही समावेश होऊ शकतो. 

पायांच्या जॉइंट्समध्ये वेदना

(Image Credit : mnn.com)

याचा अर्थ तुम्ही रूमेटॉइड अर्थारायटिसने पीडित आहात. पण ही समस्या वयोवृद्धांमध्ये अधिक असते. या स्थितीत अचानक वेदना होणे आणि काही तासांनंतर आराम मिळू शकतो. सुरूवातीला तुम्ही यासाठी वेदना दूर करणारं सामान्य औषध घेऊ शकता, पण समस्या जास्तच असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पायाच्या बोटांचे केस गळणे

(Image Credit : goodhousekeeping.com)

या स्थितीत तुमचं हृदय रक्त योग्यप्रकारे पंप करत नसतं. त्यामुळे पायांच्या बोटांपर्यंत रक्ताच्या माध्यमातून झिंक इत्यादी पोहोचू शकत नाही. झिंकच्या कमतरतेमुळे पाय आणि पायांच्या बोटांवरील केस गळू लागतात. ही समस्या दूर करण्यासाठी भरपूर भाज्यांचं सेवन करा.

नखांचा रंग बदलणे

पायाच्या बोटांच्या नखांचा रंग बदलण्याचा अर्थ आहे की, नखांमध्ये एखादं फंगल इन्फेक्शन झालंय. काही स्थितीत हे त्वचा रोगाचं लक्षणही असतं. अशात पाय डेटॉलने स्वच्छ धुवावे. त्यानंतर त्यावर मोहरीच्या तेलाचे काही थेंब टाका. लवकरच ही समस्या दूर होऊ शकते.

पायांवर सूज

सामान्यपणे फार जास्त पायी चालल्याने ही समस्या होते. दुसरीकडे ही समस्या फायलेरिया रोगाचही लक्षण असू शकतं. या स्थितीत जास्त वेळ न घालवता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जखम लवकर न भरणे

पायाला झालेली जखम फार जास्त दिवस झाल्यावरही बरी होत नसेल तर हे डायबिटीसचं लक्षण असू शकतं. वेळीच याबाबत डॉक्टरांशी चर्चा करा आणि योग्य ते उपचार करा.

नख काळं होणं

काही लोकांच्या पायांचे नख पूर्णपणे काळं होतं. हे फंगल टोनेल इन्फेक्शनमुळे होतं. हे लक्षण स्कीन कॅन्सरला जन्म देऊ शकतं. त्यामुळे याकडे सामान्य बाब समजून दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टाचांना भेगा

(Image Credit : triadfoot.com)

काही लोकांच्या टाचांना फार जास्त भेगा असतात आणि त्यात कधी कधी जखमाही असतात. इतकेच नाही तर कधी कधी यातून रक्तही येतं. या स्थितीला हायपरकेरायटोसिस म्हटलं जातं. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

नखांवर लाल रेषा

नखांवर लाल रंगाच्या रेषा दिसत असता. याचा अर्थ असा होतो की, हे हृदयाशी संबंधित एखादं संक्रमण आहे. या स्थितीत रक्ताच्या काही धमण्या तुटतात. याबाबत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Web Title: Know what your feet say about your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.