शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

महिलांना एका दिवसात किती प्रोटीनची आवश्यकता असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 1:01 PM

प्रोटीन शरीरामधील पेशी, अवयव, त्वचा, हार्मोन्स इत्यादी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे छोटे अणू शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करतं. शारीरिक सक्रियता आणि वयानुसार प्रत्येक व्यक्तीला लागणारी प्रोटीन्स आवश्यकता वेगवेगळी असते.

(Image Credit : Workout Plan)

प्रोटीन शरीरामधील पेशी, अवयव, त्वचा, हार्मोन्स इत्यादी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे छोटे अणू शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करतं. शारीरिक सक्रियता आणि वयानुसार प्रत्येक व्यक्तीला लागणारी प्रोटीन्स आवश्यकता वेगवेगळी असते. खासकरून महिलांना वजन नियंत्रित ठेवण्यासाठी प्रोटीनची गरज जास्त असते. आपल्या शरीरामध्ये 20 प्रकारचे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असतं. ज्यापैकी 8 अ‍ॅमिनो अ‍ॅसिड अत्यंत आवश्यक असतात. उरलेल्या 12 अ‍ॅमिनो अ‍ॅसिडची गरज नसते असं म्हटलं तरी चालेल, कारण आपलं शरीर स्वतः हे अ‍ॅसिड तयार करू शकते. प्रोटीन छोट्या छोट्या अणूंपासून तयार होतं. ज्यांना अ‍ॅमिनो अ‍ॅसिड असं म्हणतात. हे अ‍ॅमिनो अ‍ॅसिड एकमेकांसोबत एकत्र येऊन शृंखला तयार करतात. 

कॅलरी बर्न करतं प्रोटीन

प्रोटीनयुक्त आहार पचवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते. त्यामुळे प्रोटीन पचवण्यासाठी शरीरामध्ये जास्त कॅलरी बर्न होतात. त्यामुळे प्रोटीनचं सेवन केल्याने शरीराचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

प्रोटीन किती प्रमाणात घ्यावं

प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरानुसार वेगवेगळ्या प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते. आपल्या शरीरात प्रोटीनचे किती प्रमाण असणं गरजेचं आहे, हे आपली उंची आणि वजनावर अवलंबून असतं. योग्य प्रमाणात प्रोटीनचं सेवन अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जसं तुम्ही किती अ‍ॅक्टिव्ह आहात?, तुमचं वय काय आहे?, तुमचं बॉडी मास किती आहे? किंवा मग तुमचं आरोग्य कसं आहे?

सरासरी एवढं प्रोटीन असतं आवश्यक

जर तुमचं वजन सामान्य असेल, तुम्ही जास्त व्यायाम करत नसाल,वजन उचलत असाल तर सरासरी 0.36 ते 0.6 ग्रॅम प्रति पाउंड  (0.8 ते 1.3 ग्रॅम प्रति किलोग्रॅम वजन) प्रोटीनची आवश्यकता असते. पुरूषांसाठी सरासरी  56 ते 91 ग्रॅम दररोज आणि महिलांसाठी सरासरी 46 ते 75 ग्रॅम प्रोटीन आनवश्यक असते. 

घातक असू शकतं प्रोटीनची कमरता असणं

शरीराच्या काही भागमध्ये प्रोटीनने तयार झालेले असतात. त्यामुळे प्रोटीनची कमतरता शरीरासाठी घातक ठरू शकते. खासकरून महिलांना आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा प्रामुख्याने समावेश करावा. आपली त्वचा, केस आणि नखं प्रोटीनपासून तयार झालेली असतात. त्यामुळे प्रोटीनची कमतरता झाल्यास त्याचा परिणाम सर्वात आधी यावर दिसून येतो. केसांच्या समस्याही सुरू होतात. अनेकदा तर प्रोटीनची कमतरतेमुळे त्वचेच्या समस्याही निर्माण होतात. 

टॅग्स :Healthy Diet Planपौष्टिक आहारFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स