Janmashtami 2018 : आज कृष्ण जन्माष्टमी... हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात येते. अशी मान्यता आहे की, या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या आठव्या अवताराने जन्म घेतला होता. या दिवशी श्रीकृष्णाला पंचामृत, माखन मिश्री (लोणी आणि साखर एकत्र करून तयार केलेला पदार्थ), धनिया पंजीरी (धना पावडर आणि मखाने यांच्यापासून तयार केलेला पदार्थ) आणि फळं यांसारख्या पदार्थांचे नैवेद्य दाखवण्यात येतात. तसेच प्रसाद म्हणूनही हे पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ खाण्यासाठी जेवढे चविष्ट असतात तेवढेचं आरोग्यासाठीही लाभदायक असतात. यांमुळे डायबिटिज, कॅन्सर, लठ्ठपणा आणि इन्फेक्शनसारख्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो. न्यूट्रिशनिश्ट  आणि डाएटीशियन शिखा ए शर्मा या श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या पदार्थांचे आरोग्यदायी फायदे सांगत आहेत. 

1. पंचामृत

जन्माष्टमीला श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणाऱ्या या प्रसादामध्ये दही, मध आणि दूध यांसारखे पदार्थ वापरण्यात येतात. या सर्व पदार्थांमध्ये अॅन्टी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीराला झालेल्या कोणत्याही इन्फेक्शनपासनू बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. 

2. नारळ

नारळामध्ये व्हिटॅमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर आणि मिनरल्स यांसारखी अनेक पोषक तत्व आढळून येतात. तसेच नारळाचं सेवन केल्यानं मेंदूला चालना मिळते आणि वजनही नियंत्रणात राहते. 

3. माखण मिश्री (लोणी आणि साखर एकत्र करून तयार केलेला पदार्थ)

दूधापासून तयार करण्यात आलेलं लोणी आरोग्यासाठी आफर फायदेशीर ठरतं. यामुळे शरीराला उर्जा मिळते. प्रसादाच्या रूपात देण्यात येणारा हा पदार्थ खाल्याने शरीराला ताकद आणि उर्जा मिळते. त्याचप्रमाणे हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठीही हा पदार्थ फायदेशीर ठरतो. 

4. धनिया पंजीरी

शुद्ध तुपामध्ये धने किंवा धन्याची पावडत टाकून हा पदार्था तयार करण्यात येतो. याव्यतिरिक्त यांमध्ये ड्राय फ्रुट्सदेखील टाकले जातात. ज्यामुळे हा हेल्दी प्रसाद मानला जातो. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्याचप्रमाणे हा पदार्थ खाल्याने ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तसेच इन्फेक्शनपासूनही शरीराचा बचाव होतो.

5. फळं

या प्रसादामध्ये केळी, सफरचंद आणि मोसंबी यांसारखी फळं एकत्र केली जातात. फळांमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, अॅन्टी ऑक्सिडंट, फायबर यांसारखी पोषक तत्व आढळून येतात. फळांमधील ही पोषक तत्व कॅन्सर, डायबिटीज आणि हृदयाशी निगडीत आजारांपासून शरीराचं रक्षण करतात. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Janmashtami 2018 : sri krishna janmashtami prasad panchamrit dhaniya panjiri makhan mishri health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.