कोरोनाकाळात ऑक्सिजनची पातळी वाढवणं फार गरजेचं, खा 'ही' फळ...देतील भरपूर ऑक्सिजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 16:24 IST2021-06-14T16:23:23+5:302021-06-14T16:24:11+5:30
काही पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. जर या पदार्थांचं नियमित आणि मर्यादेत सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची आवश्यक ती पातळी वाढवणं शक्य होतं.

कोरोनाकाळात ऑक्सिजनची पातळी वाढवणं फार गरजेचं, खा 'ही' फळ...देतील भरपूर ऑक्सिजन
आपण मुळातच ऑक्सिजनवर जगतोय. कोरोनाच्या संकटामुळे ऑक्सिनजची पातळी किती महत्त्वाची असते हे देखील आपल्या लक्षात आलेलं आहे. दरम्यान काही पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात. जर या पदार्थांचं नियमित आणि मर्यादेत सेवन केल्यास शरीरातील ऑक्सिजनची आवश्यक ती पातळी वाढवणं शक्य होतं.
संत्री
संत्र्यामध्ये मुख्यत: व्हिटॅमिन सी असतं. त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडंट आणि फायबर देखील मुबलक प्रमाणात असतं. नियमित आणि विशिष्ट मर्यादेत संत्र्याचं सेवन पचन सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी मदत होते. संत्री शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
सफरचंद
सफरचंदामध्ये अॅन्टीऑक्सिडंट हा गुणधर्म असतात. ते अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. शरीरातील नव्या सेल्सच्या निर्मितीसाठी आवश्यक पोषक तत्व सफरचंदाच्या सेवनाने मिळतात. तसंच शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी सफरचंद नियमित खाणं फायदेशीर असतं.
आंबा
आंबा म्हणजे फळांचा राजा. आंब्याच्या सेवनाने शरीराला व्हिटॅमीन ए मिळतं. आंब्याचं सेवन केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासही मदत होते. शिवाय शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आंबा खूप महत्त्वपूर्ण आहे.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट आणि पॉलीफेनोल हे घटक असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरी ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. स्ट्रॉबेरी हे फळ शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठीही महत्त्वाचं आहे.