उन्हाळ्यात लसूण खावा की नाही? एक्सपर्टकडून जाणून घ्या याचे नुकसान आणि फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 11:49 AM2024-04-02T11:49:36+5:302024-04-02T11:50:26+5:30

Garlic Side Effects : कच्चा लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. पण उन्हाळ्यात जास्त लसूण खाणं नुकसानकारक ठरू शकतं. 

Is it good to eating garlic in summer | उन्हाळ्यात लसूण खावा की नाही? एक्सपर्टकडून जाणून घ्या याचे नुकसान आणि फायदे!

उन्हाळ्यात लसूण खावा की नाही? एक्सपर्टकडून जाणून घ्या याचे नुकसान आणि फायदे!

Garlic Side Effects : लसूण आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. लसणामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. कच्चा लसूण खाण्याचा सल्ला डॉक्टरही देतात. पण उन्हाळ्यात जास्त लसूण खाणं नुकसानकारक ठरू शकतं. 

लसणातील तत्व

आयुर्वेदानुसार, लसणामध्ये अ‍ॅंटीसेप्टीक, अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी व्हायरल आणि अ‍ॅंटी इन्फ्लामेटरी गुण असतात. सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2 ते 3 कळ्या खाल्ल्या तर आजार दूर केले जाऊ शकतात. तसेच याने शरीरातील अवयव निरोगी आणि शक्तीशाली बनतात. अशात आधी लसणाचे फायदे जाणून घेऊ नंतर याचे नुकसान जाणून घेऊ...

पोषण मिळतं

शक्ती वाढवण्यासाठी प्रोटीन आणि इतर पोषक तत्व फार गरजेचे असतात. लसणाच्या या पांढऱ्या कळ्यांमध्ये प्रोटीन, कार्ब्स, मॅगनीज, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, सेलेनियम आणि फायबर असतं.

इम्यूनिटी वाढते

इम्यूनिटी वाढवण्यासाठीही लसूण खाल्ला जातो. 2016 मधील एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, कच्चा लसूण खाल्ल्याने सर्दी-खोकलासारख्या सामान्य समस्या लगेच दूर होतात. या प्रक्रियेत एका खास लिक्विडमध्ये कळ्या भिजवून ठेवल्याने 20 महिन्यांपर्यंत स्टोर करता येतात.

पुरूषांसाठी फायदेशीर

महिलांच्या तुलनेत पुरूषांना हृदयरोगांचा धोका अधिक राहतो. ज्याचं मोठं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे. नियमितपणे लसणाचं सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशरच्या औषधासारखा प्रभाव बघण्यात आला आहे.

स्टॅमिना वाढतो

लसणाचा वापर तुम्ही स्टॅमिना वाढवण्यासाठीही केला जाऊ शकतो. जुन्या काळात ग्रीसमधील खेळाडू या उपायाचा वापर करत होते. जेणेकरून त्यांना थकवा आणि कमजोरी जाणवू नये.

हाडांसाठी फायदेशीर

हाडे कमजोर झाली असतील आणि वेदना होत असेल हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. अनेक शोधात हे आढळून आलं आहे की, महिला लसणाचं सेवन करून ऑस्टियोपोरोसिस आणि ऑस्टियो आर्थरायटिसचा धोका कमी करू शकतात.

लसूण खाण्याचे नुकसान

त्वचेचं नुकसान

काही लोक हे चेहऱ्यावर लसणाची पेस्ट लावतात. पण हे काहींसाठी नुकसानकारक ठरु शकतं. उन्हाळ्यात काहींसाठी असं हे चांगलं असलं तरी काहींना यामुळे चेहऱ्यावर जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार कुणी टाळावं लसणाचं सेवन

आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की, लसणामध्ये अनेक औषधी गुण असतात. जे आरोग्याला मोठे फायदे देतात. हिवाळ्यात लसूण फारच फायदेशीर ठरतो. याचं सेवन उन्हाळ्यातही करता येतं.

मात्र, उन्हाळ्यात प्रमाण कमी असावं. पण हाय ब्लड प्रेशर, गॅस आणि पोटात जळजळसहीत इतर काही समस्या असलेल्या लोकांनी लसूण खाऊ नये. असं केल्याने त्यांची समस्या वाढू शकते आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. अशात लसणाचं सेवन काळजीपूर्वक करावं. आता उन्हाळा सुरू झाला आहे. अशात लसणाचा वापर कमी केला पाहिजे.

आयुर्वेदिक डॉक्टरांनुसार, हाय ब्लड प्रेशर, अॅसिडिटी, गॅस, पोटात जळजळ आणि लूज मोशन असलेल्या लोकांनी लसणाचं सेवन करू नये. असं केल्याने ब्लड प्रेशर वेगाने वाढू शकतं. जे अनेकदा हार्ट अटॅकचं कारण बनतं.

ब्लीडिंग डिसऑर्डर

कच्चा लसूण तुमची ब्‍लीडिंगची समस्या वाडवू शकतो. त्यामुळे ब्लीडिंग डिसऑर्डरच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी लसणाचं सेवन योग्य प्रमाणातच करायला हवं. 

Web Title: Is it good to eating garlic in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.