शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 10:16 IST

या ऑपरेशननंतर श्री एका तासातच बरी झाली. तिला बरे होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर ३ ते ५ दिवस इंजेक्शन देण्याचा सल्ला देण्यात आला. 

पुणे - नहमी इथून तिथे पळणारी 'श्री' अचानक शांत झाली, तिने जेवण बंद केले. घरचेही तिच्याकडे पाहून अस्वस्थ झाले. ही गोष्ट आहे तळेगावजवळील सोमाटणे येथील नामदेव यांच्याकडील श्री या मादी कासवाची...कासवाच्या अंडी बाहेर पडण्याच्या जागेस सूज आल्याचं दिसून आले. तिला प्रचंड अस्वस्थ वाटत होते. अंडी बाहेर काढण्याचा ती प्रयत्न करत होती परंतु तिला वेदना सहन होत नव्हत्या. मागील १-२ महिन्यापासून श्री नावाची मादी कासव आरोग्याशी संघर्ष करत होती. त्यावेळी तिच्या घरच्यांनी पुण्यातील स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकमध्ये तिला दाखवले. याठिकाणी डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली श्रीवर लॅप्रोस्कोपिक पद्धतीचा वापर करून दुर्मिळ शस्त्रक्रिया पार पडली. भारतातील ही पहिलीच शस्त्रक्रिया होती. या ऑपरेशनमुळे श्री ला नवे जीवदान मिळाले आहे. 

याबाबत पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले की, क्रॉनिक एग-बाइंडिंग सिंड्रोम, यकृताचा आकार वाढणे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या मादी कासवावर यशस्वी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेत चार पूर्णत: तयार झालेली अंडी बाहेर काढल्याने कासवाला वाचवता आले. कासवाला जेव्हा त्याच्या पालकांनी आणले, तेव्हा त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. तिला ‘एग बाऊडींग’ चा त्रास असल्याचे लक्षात आले. या स्थितीत कासव नैसर्गिकरित्या अंडी देऊ शकत नाहीत. अल्ट्रासाऊंडमध्ये वाढलेले यकृत आणि पूर्णपणे तयार झालेली अंडी देखील दिसून आली. रक्त चाचण्यांमध्ये या कासवाची हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्याचे दिसून आले. एपिडोसिन इंजेक्शनने अंडी बाहेर काढण्याचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी झाले. श्रीने खाणे बंद केल्याने तिची शक्ती टिकवून ठेवण्यासाठी तिला हाताने खायला देण्यात आले. तिचे हृदय सामान्यपणे काम करत होते. जे शस्त्रक्रियेपूर्वीचे सकारात्मक लक्षण होते. मात्र रक्त चाचण्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून आली म्हणून ऑपरेशन सुरू करण्यापूर्वी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी काही औषधे लिहून देण्यात आली. 

त्यानंतर श्रीची शस्त्रक्रिया २१ जुलै २०२५ रोजी लॅप्रोस्कोपिक पध्दतीचा वापर करुन केली जाणार होती. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान तिला आरामदायी राहण्यासाठी काळजीपूर्वक इंट्युबेट करण्यात आले आणि ऑक्सिजनसह भूल देण्यात आली. तिचे वजन १.५ किलो होते. बीपी डॉप्लर आणि एसपीओ २ सेन्सर वापरून तिच्या जीवनावश्यक अवयवांचे निरीक्षण करण्यात आले. तिला उबदार ठेवण्यासाठी अंगाखाली एक हीटिंग पॅड ठेवण्यात आलं. शस्त्रक्रियेत तिच्या गर्भाशयाच्या उजव्या पायाजवळ एका लहान छिद्र पाडून फॅलोपियन ट्यूब अंडाशयापर्यंत नेली आणि चार पूर्णपणे तयार झालेली अंडी काढण्यात आली. त्यानंतर अंडाशय देखील काढून टाकण्यात आले. या ऑपरेशननंतर श्री एका तासातच बरी झाली. तिला बरे होण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर ३ ते ५ दिवस इंजेक्शन देण्याचा सल्ला देण्यात आला. 

दरम्यान, अशा परिस्थितीत अंडी काढण्यासाठी कवच कापावे लागते मात्र या प्रकरणात डॅाक्टरांनी प्रसंगावधान राखत शस्त्रक्रिया केल्याने कवच वाचविता आले. त्यामुळे संसर्गाचा धोका टळला. ही भारतातील पहिली लॅपरोस्कोपिक एग-बाउंड शस्त्रक्रिया आहे.  जिथे सेव्होफ्लुरेन गॅस ऍनेस्थेसियासह GE 620 केअरस्टेशनचे यांत्रिक व्हेंटिलेशन वापरले गेले. श्री च्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. ती आधीसारखी उत्साही वाटत आहे असं डॉक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :docterडॉक्टर